पुसद येथे स्वागत रॅली
पुसद : सहकाऱ्यांचे प्रेम हीच खरी प्रेरणा असल्याचे मत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केले. स्वागत रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. राज्य मंत्रिमंडळातील समावेशा नंतर पुसद शहरांमध्ये प्रथम आगमना निमित्य सहका-यांनी स्वयंस्फूर्तीने भव्य स्वागत यात्रेचे आयोजन केले होते. जलक्रांतीचे प्रणेते सुधाकर रावजी नाईक साहेब यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या स्वागत यात्रे सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांना अभिवादन करून भगवान गौतम बुध्द, महात्मा ज्योतिबा फुले, घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून नाईक बंगल्यामध्ये स्वागत यात्रेचा समारोह करण्यात आला.
स्वागत यात्रेमध्ये ठिकठिकाणी पुसद मधील नाईक प्रेमींनी ना. नाईक यांचा सपत्नीक सत्कार केला. स्वागत यात्रेमध्ये जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण, डीजे, डफडे यांच्या सोबतीला हजारोंच्या जनसमुदायाने ही स्वागत यात्रा लक्षवेधक ठरत होती. ह्या स्वागत यात्रेत लाडक्या बहिणींनी ना इंद्रनील नाईक यांचा सत्कार करून राज्य सरकारचे आभार मानले.
स्वागत यात्रेत महायुती मधील घटक पक्षांचे पदाधिकारी ग्रामीण भागातील युवा सहकारी तथा मित्र परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments