रिव्हॉल्व्हरचा धाकावर ज्वेलरी चालकास लुटले; पाचवा आरोपी जेरबंद


यवतमाळ : आर्णी पोलीस ठाण्यात अंतर्गत आर्णी ते  सावळी सदोबा  रोडवर लोडगे ज्वेलर्सच्या चालकाला रिव्हॉल्व्हरचा धावांवर लुटले होते. या  दरोडा प्रकरणातील फरार असलेल्या अटल आरोपीला जेरबंद करण्यात आले. 

साकीब खान अयुब खान वय २८ वर्ष रा.शहा कॉलनी, उमरखेड असे आरोपीचे नाव आहे. दिनांक ३/५/२०२३ रोजी आर्णी ते सदोबा सावळी रोडवर पाच आरोपींनी सिनेस्टाईल दरोडा टाकुन सावळी येथे ज्वेलरीची दुकान चालवीणार विशाल लोडगे यांचे कारचा सिनेस्टाईल पाठलाग करून रिवॉल्वरचा धाक दाखवुन त्यांचे वाहन अडवुन त्यांचेकडुन सोन्याचांदीचे दागीने व रोख असा लाखो रूपयांचा मुददेमाल जबरीने हिसकावुन नेला होता. या गुन्हयात आर्णी पौलीसांनी आधीच चार आरोपींना अटक करून त्यांचेकडून त्यांचे हिश्यावर आलेला एकुण २५,९१,००० (पंचवीस लाख एक्यान्नउ हजार रूपयांचा मुददैमाल जप्त केला होता. सदर गुन्हयात्त आरोपी क ५ साकीब खान अयुब खान वय २८ वर्ष रा.शहा कॉलनी, उमरखेड हा घटना तारखेपासुन फरार होता. तो आदीलाबाद, हैदराबादला राहुन वारंवार त्याचे राहण्याची ठिकाणे बदलवीत होता. आर्णी पोलीसांनी १० ते १२ वेळा अथक प्रयत्न करूनही तो अटकेला हुलकावणी देत होता. पोलीस अधीक्षक  कुमार चिंता यांनी सदर प्रकरणी तात्काळ सदर आरोपीस अटक करण्याचे आदेश आर्णी पोलीसांना दिले होते. शेवटी अनेक दिवसांपासुन आरोपीच्या अटकेच्या प्रतिक्षेत असलेल्या आर्णी पोलीसांनी गुप्त बातमीदाराच्या आधारे सापळा रचुन त्याला दिनांक २८/१२/२४ रोजी दुपारी मोठ्या चलाखीने अटक केली. त्याचेकडुन त्याचे हिश्यावर आलेला साधारणतः लाख रूपयांचा मुददैमाल जप्त करणे बाकी आहे.

सदर कार्यवाही श्री. कुमार चिंता , पोलीस अधिक्षक यवतमाळ यांचे आदेशाने  पियुष जगताप , अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ व  चिलुमुला रजनिकांत साहेब, सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा याचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केशव ठाकरे साहेब. सपोनि प्रशांत देशमुख, पोहवा/२२२२ मनोज चव्हाण, पोहवा/२००२ अतुल तागडे, पोकॉ/१३०१ अरवींद चेमटे यांनी ही कामगिरी पार पाडली.

Post a Comment

0 Comments