108 जोडपे विवाह बंधनात अडकणार

यवतमाळ येथे सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह संमेलन


यवतमाळ : सत चिकित्सा प्रसारक मंडळ, यवतमाळ आणि हृदय स्पंदना यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन 11 मे 2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजता करण्यात येणार आहे. हा सोहळा हॉटेल वेनिशियन, जाम बायपास रोड, यवतमाळ पार पडणार असून, 108 वधू-वरांचे विवाह पार पडणार आहे.

सर्वधर्मीय विवाह सोहळ्याची सुरुवात आणि यशस्वी परंपरा

सन 1994 मध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम सर्वधर्मीय सामूहिक विवाहाची सुरुवात यवतमाळ येथे सत चीकित्सा प्रसारक मंडळाच्या पुढाकाराने झाली. गेल्या 30 वर्षांपासून हा सोहळा सुरु आहे. आतापर्यंत हजारो कन्यांचे विवाह या सोहळ्यात करण्यात आले आहे. वर-वधूंच्या पालकांकडून नोंदणीसाठी , किंवा अन्य कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. तसेच धार्मिक परंपरेचा सन्मान येते. प्रत्येक धर्माच्या रितीरिवाजा नुसार विवाह विधी पार पाडले जातील.

नोंदणीसाठी आवाहन

विवाहयोग्य वर-वधूंच्या पालकांनी विवाह नोंदणीसाठी डॉ. नंदुरकर विद्यालय, यवतमाळ येथे संपर्क साधावा,अधिक माहिती साठी 080871 26775 ,090114 62777 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, विवाह संमेलनाचा फायदा सर्वांनी घ्यावाअसे आवाहन सत चिकित्सा प्रसारक मंडळाने केले आहे.

Post a Comment

0 Comments