ऑपरेशन प्रस्थान : पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह 184 दात्यांचे रक्तदान

यवतमाळ : ऑपरेशन प्रस्थान व पोलीस रेझिंग डे निमित्त उमरखेड पोलीस ठाण्याच्या वतीने महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात 16 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. तसेच एकुण 184 जणांनी रक्तदान केले.

एसडीपिओ हनुमंत गायकवाड यांचे मार्गदर्शनात उपविभाग स्तरावर आज दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी 11.00 ते 5.45 वाजता दरम्यान महा रक्तदान शिबिराचे पोलीस ठाणे उमरखेड पोलीस वसाहत येथे आयोजन करण्यात आले. होते.सदर शिबिरामध्ये उपविभागातील उमरखेड पोलिस ठाणे हद्दीतील एकूण 184 रक्तदाते यांनी रक्तदान केले. यावेळी उपविभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी परिश्रम घेतले. 



Post a Comment

0 Comments