450 उप वधु- उप वर परिचय मेळाव्यात सहभागी होणार

तेली समाजाच्या वतीने परिचय मेळाव्याचे आयोजन 


यवतमाळ : सध्या धकाधकीच्या जीवनात लग्न करण्यासाठी उप वधु- वरांना योग्य जोडीदार मिळविण्याठी धडपड करावी लागते. त्यासाठी त्यांचे आई-वडील, मामा व अन्य नातेवाईका स्थळ शोधण्यासाठी फिरावे लागते. पर्यायाने त्याचा  वेळ वाया जात असून आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. सर्व धडपड करुनही लग्न जुळत नाही. त्यामुळे उप वधु-वरांना एकमेकांना योग्य जोडीदार मिळावा या हेतुने तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने 5 जानेवारी 2025 रोजी सर्व शाखीय तेली समाजा उप वधु वर मुला-मुलींचा परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे.

यवतमाळ येथील श्री संताजी मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्यात 450 उप वधु- वर सहभागी होणार आहे. या मेळाव्याचे उ‌द्घाटन आ. बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते होणार आहे. या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन
देविदास देऊळकर, रामकृष्ण पजगाडे, सुरेश अजमिरे, विद्या पोलादे, अशोक जयसिंगपूरे, प्रकाश मुडे, दामोधर मोगरकर, मनोहर गुल्हाने, सुरेश जयसिंगपूरे, राजेश चिंचोरे, जितेंद्र हिंगासपूरे, दिवाकर किन्हीकर, उत्तम गुल्हाने, आर.आर. शिरभाते, मुकुंदराव पोलादे, नंदकिशोर जिरापूरे, शिवदास गुल्हाने, किशोर गुल्हाने, रश्मी गुल्हाने, राम ढाले, संजय अंबाडेकर, बाळासाहेब शिंदे, अभिजीत शिंदे, अजाबराव तंबाखे , केदार शिरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments