बँकेचे बनावट बॉन्ड बनवले
यवतमाळ : पतसंस्था, बँकेत जास्त व्याजदर देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार होत असल्याचे चित्र पहावयास येत आहे. अशाच प्रकारातून जास्त एका महिलेला जास्त व्याजाचे आमिष दाखवून 47 लाखाने फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली.
ज्ञानेश्वरी रंभाजी रुपनर (शेडगे) वय 74 रा. रंभाजी नगर वाघापूर यवतमाळ असे फिर्यादीचे नाव आहे. तर पंकज महादेव इंजेवार वय 40 रा. मराठा कॉलनी गोपाल नगर अमरावती असे आरोपीचे नाव आहे. आरोपी पंकज इंजेवार याने तिरुपती मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लिमीटेड ब्रँच परतवाडा मध्ये आकर्षक व्याज मिळून देण्याचे आमिष दाखवले. महिलेने 47 लाख रुपये मुदत ठेवीकरीता दिले. मात्र आरोपीने बनावट मुदत ठेवीचे तिन बाँड फिर्यादी महिलेस दिले. फिर्यादीची दिनांक 22/05/2023 ते एप्रिल 2024 पर्यंत अन्यायाने विश्वासघात करुन 47 लाख रुरुपयांची फसवणूक केली. हा प्रकार उघडकीस येताच महिलेने लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी लोहारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
0 Comments