यवतमाळ : यवतमाळ झेड पी चे ॲग्रीक्लचर ऑफीसर (जिल्हा
परिषद कृषी अधिकारी) आज १ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजता मॉर्निंग वॉक
करण्यासाठी गेले होते. अशातच अचानक हार्ड अटॅक आल्याने त्यांची डेथ (मृत्यू) झाली.
पंकज रामदास बरडे वय ५० वर्ष राहणार कोपरा जानक ह.मु. अयोध्या नगर, यवतमाळ असे मृतकांचे नाव आहे.
यवतमाळ येथील जिल्हा परिषद कृषी अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. नेहमीप्रमाणे आज
सकाळी ते मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेले होते. अचानक हार्ड अटॅक आल्याने त्यांचा
मृत्यू झाला. मरणोपरान्त त्यांचे नेत्रदान करण्यात आले आहे. आज १
जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास यवतमाळ
येथील पांढरकवडा रोडवरील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात
येणार आहे. त्यांच्या पश्चात आई,
पत्नी
प्रा. स्नेहल बरडे, मुलगा आर्यन १६ वर्षे,
सासरे
प्रकाशराव लोखंडे (दाभा ) अमरावती व बराच मोठा आप्त परिवार
आहे.
0 Comments