यवतमाळ : जिल्ह्यातील पांढरकवडा येथील शिवरामजी मोघे महाविद्यालयातील इंग्रजीचे प्रा. नितीन वासनिक यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. 'अँन अँनालिटीकल स्टडी ऑफ कलोन्यालिझम अँण्ड पोस्ट कलोन्यालिझम इन द सिलेक्ट नाँव्हेल्स ऑफ नयनतारा सहगल' हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. चांदुरबाजार येथील जी. एस. टोम्पे महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. मंगेश अडगोकर यांच्या मार्गदर्शनात प्रा. नितीन वासनिक यांनी संशोधन करून हे यश संपादन केले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
The Menu of this blog is loading..........
0 Comments