ट्रकने दुचाकीला उडवले
ट्रकने दुचाकीला उडवले
यवतमाळ : जिल्ह्यात सर्वत्र नववर्ष साजरे होत असतांना यात्रेवरुन घरी परत येणा-या इसमाच्या दुचाकीला अनियंत्रीत वेगातील ट्रकने जोरदार धडक दिली. या भिषण अपघातात एकाच कुटुंबातील तीघांचा मृत्यू झाला. या घटनेने वणी तालुक्यात शोककळा पसरली असून, नववर्षाच्या आनंदावर विरजन पडले आहे.
मायरा राहुल नागपूरे वय २ वर्ष, सतीष भाउराव नागपूरे वय ५१, मंजुषा सतीष नागपूरे वय ४६ रा. घोण्सा ता. वणी अशी मृतकांची नावे आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती येथे नववर्षानिमित्त यात्राचे आयोजन करण्यात येते. या यात्रेसाठी ते गेले होते. त्यानंतर चंद्रपुर वरोरा मार्गावरील धाब्यावर जेवन करुन नागपूरे कुटुंब आपल्या दुचाकीने घरी परत येत होते. अशातच भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला धडक दिली. या भिषण अपघातात सतीष नागपूरे व त्यांची पत्नी मंजुषा सतीष नागपूरे हे जागीच ठार झाले. तर त्यांची दोन वर्षाची नात मायरा राहुल नागपूरे ही गंभीर जखमी झाली होती. तीला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यान तीचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळता भद्रावती पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. दरम्यान आज १ जानेवारी रोजी तीघांवरही वणी तालुक्यातील घोन्सा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 Comments