यवतमाळ : जिल्ह्यातील मुकुटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या पिल्कीवाढोणा
शेत शिवारात कोंबड बाजार सुरु होता. या बाबतची माहिती मिळताच पोलिसांनी कोंबड
बाजारावर धाड टाकुन तीन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून झुंज लावणारे कोंबडे
व हजारोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आज ५ जानेवारी २०२५ रोजी रविवारी दुपारी
१.१६ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
विकास देवाजी
राउत वय 35 वर्ष रा. चिचघाट ता. झरी, गजानन
फकरु चाटारे वय 35 वर्षे, रा. चिचघाट ता. झरी, देवानंद मारोती जगनाळे वय 36 वर्ष रा. साखरा ता.
वणी अशी आरोपींची नावे आहे. पिल्कीवाढोना
शेत शिवारातील जंगलात मोकळ्या जागेवर ते कोंबड बाजार नावाचा खेळ खेळत होते.
या बाबतची गोपनिय माहिती मुकुटबन पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी धाड
टाकुन तीन आरोपींना अटक केली. त्याच्याकडून कोंबड, टोकदार कात आदि मुद्देमाल जप्त
करण्यात आला. पो. कॉ. अंकुश दौलत बोरकर वय 39 वर्ष यांच्या तक्रारीवरुन पो.स्टे. गुकूटबन
येथे अप.क्र. 02/2025 कलम 12 (ब) महाराष्ट्र जुगार
कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई
ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली ASI प्रकाश गोरलेवार, पोहेकॉ नईम शेख, पोका चंद्रकांत, पोका बादल यांनी केली.
0 Comments