एक्साईज
एसपीसह निरीक्षकांवर गंभीर आरोप सिआयडी
मार्फत चौकशी करण्याची मागणी
यवतमाळ :
जिल्ह्यातील पांढरकवडा परिसरात दारुचे बॉक्स असलेल्या वाहनाचा अपघात झाला. या
अपघातात वाहनाचा चालक ठार झाला असून, अवैधपणे दारुची तस्करी होत असल्याचे उजागर
झाले आहे. तसेच बियर शॉपी व बियर बार परवाना धारकांना व्यावसाय करण्यासाठी वेळ
निर्धारीत केला आहे. मात्र अनेक बार व शॉपी धारकांकडून शासनाच्या नियमाला तिलांजली
देत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शासनाच्या नियमाचे उल्लंघन होत असतांना
एक्साईज डिपार्टमेंटकडून दुर्लक्ष करुन अभय देत असून, एसपीसह निरीक्षकांवर गंभीर आरोप
होत आहे.
1 जानेवारी 2025 रोजी पहाटे 2 वाजताच्या सुमारास
सोनवडी जवळ I.T.I च्या बाजुला देशी दारु वाहतुक
करीत असतांना खाजगी मारुती ओमणी चारचाकी वाहन चा अपघात झाला. या अपघातात राम मुत्यलवार रा. पांढरकवडा यांचा मृत्यु झाला. तो देशी
दारु दुकानदाराकडे खाजगी नोकरी करत होता. त्याचा
मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सदर कुटुंबियाला आर्थीक मदत
देण्यात देवून एकाला शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी केली. तसेच जिल्हाधिका-यांकडे
दिलेल्या दारु तस्करी संदर्भातील तक्रारीची गुन्हे अन्वेषण भरारी पथक
नागपूर किवा पुणे यांच्या मार्फत करण्यात यावे अशी मागणी रजनीकांत बोरेले यांनी केली
आहे. तसेच मुख्य सचिव राज्य शासन, सचिव शुल्क उत्पादन
राज्य शासन मंत्रालय मुंवई यांच्याकडेही तक्रार केली आहे.
0 Comments