नागपूर फिल्म फेस्टिवलच्या वतीने पुरस्कार जाहिर
यवतमाळ : दुरदर्शन या वाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी आनंद कसंबे यांच्या ‘एक भरारी’या
माहितीपटाला नागपूर फिल्म फेस्टिवलच्या वतीने पुरस्कार जाहिर
करण्यात आला. नागपूर चलचित्र फाउंडेशन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
विद्यापीठ नागपूर द्वारा आयोजित नागपूर फिल्म फेस्टिवल 2025 मध्ये नवनिर्माण महिला ग्राम संघ ‘एक भरारी’ या माहितीपटाला व्यवसायिक गटातील सर्वोत्कृष्ट
माहितीपटाचा पुरस्कार मिळाला आहे. सदर माहितीपट हा यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील
एकलारा येथील महिलांच्या कर्तृत्वावर आधारित आहे.
आदिवासी महिलांचा हा ग्राम संघ आहे.
या द्वारा या महिला गावातील तलावात मत्स्यपालन
करतात आणि चांगलं उत्पादन मिळवितात. माहितीपटाचं
लेखन, संकलन आणि दिग्दर्शन दुरदर्शनचे
जिल्हा प्रतिनिधी आनंद कसंबे यांचे आहे. तर चित्रीकरण
करण पेनोरे यांच आहे. तर निवेदन अर्चना संत
यांच आहे. यापुर्वी आनंद कसंबे यांच्या शोध भाकरीचा या
माहिती पटाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच त्यांना अनेक
पुरस्कार मिळाले असून, पत्रकार आनंद कसंबे यांचे सर्वस्तरावरुन अभिनंदन होत आहे.
0 Comments