१८ जानेवारी रोजी परिक्षा : 40 केंद्रांवर परिक्षा
यवतमाळ : जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी पालकांसह
विद्यार्थ्यांची धडपड सुरु असते. या विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी परिक्षा
द्यावी लागते. जवाहर नवोदय विद्यालय 2025-26 या
शैक्षणिक वर्षासाठी सहाव्या वर्गात प्रवेश मिळविण्याकरीता दि.
18 जानेवारी रोजी परिक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी 11
ते दुपारी 1. 30 वाजताच्या दरम्यान होणार
आहे. जिल्ह्यातील 40 केंद्रांवर ही परिक्षा होणार आहे. परिक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांनी
या दिवशी आपल्या केंद्रावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एक तासापूर्वी हजर राहणे अनिवार्य
विद्यार्थ्यांनी परिक्षेला एक तास अगोदर प्रवेश पत्रात दिलेल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. सोबत आधार कार्डची झेरॉक्स सोबत आणावे. परिक्षा केंद्र पुढील प्रमाणे आहे.
परिक्षा केंद्राची यादी
एम. डी. भारती बॉईज हायस्कूल आर्णी, शहीद भगतसिंग स्कूल आर्णी, एस.एम.डी. भारती गर्ल्स स्कूल आर्णी, प्रताप हायस्कूल बाभुळगाव, शिवाजी हायस्कूल दारव्हा, व्ही.बी. घेरवारा हायस्कूल दारव्हा, उमाबाई कानीकर विद्यालय दारव्हा, दिनबाई विद्यालय दिग्रस, एस. पी. एम. बॉईज हायस्कूल घाटंजी, एस. पी. एम सिनियर कॉलेज घाटंजी, चिंतामणी हायस्कूल कळंब, मातोश्री माध्यमिक विद्यालय महागाव, टी. जी. देशमुख आश्रमशाळा आमणी, ता.महागावचा समावेश आहे. सावित्रीबाई कन्या विद्यालय महागाव, आदर्श बॉईज हायस्कूल मारेगाव, राष्ट्रीय विद्यालय मारेगाव, न्यू इंग्लिश हायस्कूल नेर, शिवाजी हायस्कूल नेर, जीवन विकास माध्यमिक विद्यालय नेर, जिल्हा परिषद हायस्कूल पांढरकवडा, विकास हिन्दी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पांढरकवडा, के.ई.एस. हायस्कूल पांढरकवडा, के.डी हायस्कूल पुसद, लोकहीत विद्यालय पुसद, शिवाजी हायस्कूल पुसद, गुणवंतराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कवडीपुर तांडा श्रीरामपूर, पुसद, नेताजी हायस्कूल राळेगाव, न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव, साकळे विद्यालय उमरखेड, गुरूदेव गोरोबा विद्यालय उमरखेड, कस्तुरबा कन्या विद्यालय ढाणकी ता. उमरखेड, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड, जिल्हा परिषद बॉइज हायस्कूल उमरखेड, एस.पी.एम बॉइज हायस्कूल वणी, जनता विद्यालय वणी, विवेकानंद हायस्कूल वणी, अँग्लो हिन्दी हायस्कूल यवतमाळ, अभ्यंकर कन्या विद्यालय यवतमाळ, आदर्श बॉईज हायस्कूल मुकुटबन, ता. झरी जामणी, गुरुकुल कॉन्वेन्ट स्कूल मुकुटबन, ता. झरी जामणी या केंद्राचा समावेश आहे.
0 Comments