डॉ भालचंद्र वाघ यांचे देहावसान ; उद्या गुरुवारी अंत्यसंस्कार
यवतमाळ : मेंदूतील रक्त स्त्रावाने येथील प्रसिद्ध डॉक्टर भालचंद्र र्धेर्यशिल वाघ यांचे काल
मंगळवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास नागपुरात निधन झाले. त्यांचे पार्थिव आज बुधवारी यवतमाळ येथील निवासस्थानी आणण्यात आले. उद्या दि. ९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता येथील पांढरकवडा
मार्गावरील मोक्षधामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे
पत्नी जयश्री, मुलगा डॉ. साहील वाघ, दोन मुली दोन्ही
दंत्यवैद्यक व्यवसायी आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.
कोण आहेत डॉ. वाघ
डॉ. वाघ यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील रोहणा या छोट्याश्या गावी
१९५१ ला एका कुलीन व सुसंस्कारीत घराण्यात झाला. त्यांचे वडील धैर्यशील वाघ हे विधानसभा
सदस्य व संसदपटु म्हणून सुपरिचित होते. वडीलांनी डॉ. वाघ यांच्यावर जे संस्कार केले
त्या संस्काराची जपवणूक डॉ वाघ यांनी उत्तमरीत्या केली. यवतमाळ येथील डॉ. भालचंद्र
वाघ आय.एम.ए सभागृहाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी काही काळ आय. एम.ए.चे
अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. यवतमाळ येथील हिराचंद मुणोत मेमोरीअल क्रिटीकेअर रूग्णालयाच्या
उभारणीतही त्यांची कामगिरी अंत्यत उल्लेखनीय अशी आहे. रूग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक
म्हणून कर्तव्य बजावतांना त्यांनी क्रिटिकेअरच्या विकासाकरिता अत्यंत समर्पितपणे काम
केले आहे. त्यांच्या मृत्यूने वैद्यकीय विश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments