अंमली पदार्थ विक्रेत्यास अटक, ११ किलो गांजा जप्त


यवतमाळ : अंमली पदार्थ विक्रेते छुप्या पद्धतीने अंमली पदार्थची (गांजा) विक्री करण्यात येते. या बाबतची माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने धाड टाकुन एका आरोपीला अटक केली. त्याच्याकडून ११ किलो गांजा किंमत २ लाख ३७ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) पथकाने शहरातील अलकबिर नगरात १६ जानेवारी रोजी केली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी आरापी विरुद्ध NDPS कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

समशेर खान ऊर्फ गुड्डू सरदार खान वय 29 वर्ष रा. अलकबीर नगर, यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे. सदर आरोपी आपल्या घरी गांजा अंमली पदार्थ ठेवून विक्री करीत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी अलकबिर नगरात धाड टाकुन आरोपीला ताब्यात घेतले. त्या ठिकाणावरुन 11 किलो 052 ग्रॅम गांजा, मोबाईल असा एकूण किंमत 2,37,380/- रु चा मुददेमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अंमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1895 चे कलम 8(c), 20(b) (2) (B), 29 अन्वये अपराध क्रमांक 40/2025 प्रमाणे पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

अवैध धंद्याची माहिती देण्याचे आवाहन

स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ही अवैध धंदे, अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई, गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी चे उच्चटन करण्यास कटिबध्द आहे. यापुढे यासंबंधी माहिती असल्यास सदरची माहिती जनतेने कोणतीही भिती मनात न बाळगता पोलीसांना पुरवावी व सहकार्य करावे ही विनंती.

कारवाई करणारे पथक

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ, कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने, पोलीस निरीक्षक सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि सुगत पुंडगे, पोउपनि गजानन राजमल्लु, सफौ बंडु डांगे, सफौ सै. साजिद, सफौ योगेश गटलेवार, पोहवा अजय डोळे, पोहवा रुपेश पाली, पोहवा विनोद राठोड, पोहवा प्रशांत हेडाऊ, पोहवा रितुराज मेडवे, पोशि सलमान शेख, पोशि आकाश सहारे, पोशि देवेंद्र होले, पोशि आकाश सुर्यवंशी, मपोहवा अरुणा भोयर, चापोहवा योगेश टेकाम, चापोहवा विवेक पेठे यांनी केली.


Post a Comment

0 Comments