आकोडा टाकुन वीज चोरताय ! : सावधान

महावितरणचा वीज चोरट्यावर ‘वॉच' 
तीन महिने मोहिम राबविणार


यवतमाळ : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे शहरात लाखोच्यावर अधिकृत ग्राहक आहे. मात्र काही वीज ग्राहक आपण वापर केलेल्या वीजेचे बिल जास्त येवु नये म्हणून मिटरमध्ये छेडछाड करत असल्याचे सर्वश्रुत्र आहे. तसेच अनेक महाभाग रिमोटच्या सहाय्याने मिटर बंद करण्यासाठी रिमोटचाही वापर करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वीज ग्राहक वीज चोरण्यासाठी नवनवीन शक्कल लढवित असून महावितरण विभागाला लाखो रुपयाचा आर्थीक फटका बसत आहे. त्यामुळे वीज चोरी रोखण्यासाठी १९ वीज चोरी पथकाची निर्मिती केली आहे. सदर पथकाकडून वीज ग्राहकांवर वॉच राहणार आहे. तीन महिने म्हणजेच १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत ही मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात ९९ हजार ग्राहकांकडे ७९ कोटीची थकबाकी असून, त्यांचा वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडीत करण्यात आला आहे. जिल्ह्यात वितरण हानी १५% पर्यंत कमी करण्यात येणे गरजेचे आहे. वीज चोरी करणा-या ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.


Post a Comment

0 Comments