८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, एलसीबीची कारवाई
मोहंमद हातम
अब्दुल नवी वय ४९ वर्षे रा. दुर्गाचौक रोशन पुरा मुर्तिजापुर जि. अकोला, मोसिन अलि सैय्यद मोबीन वय ४५ वर्षे रा. वार्ड क्रमांक १ ता.
अकोट जि. अकोला, ईरशाद
उल्लाखा किस्मत उल्ला खॉ वय ३२ वर्षे रा. पठाणपुरा मुर्तिजापुर ता. मुर्तिजापुर जि.
अकोला अशी आरोपींची नावे आहे. ६ जानेवारी रोजी रात्री १२.३० वाजताच्या
सुमारास एक इसम नागपुर- पांढकरवडा- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर
सापळा हैद्राबाद करीता ट्रक क्रमांक MH-२६-BN-११३७, ट्रक क्रमांक- CG-२४-S-७६६७ मध्ये अवैद्य गोवंशाची
तस्करी करीत आहे अशी माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्या आधारे पथकाने नागपुर-हैद्राबाद रोडवरील केळापुर
टोल प्लॉझा येथे सापळा रचुन पांढरकवडा - हैद्राबाद जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवुन पहाटे
५ वाजताच्या सुमारास सदर ट्रक थांबवुन कारवाई केली. त्यात गोवंशीय बैल, गोरे, असे एकुण १२१ गोवंश
जातीचे जनावरे नमुद दोन्ही वाहने असा एकुण किंमत अंदाजे ८७,२१,०००/- कोंबुन नेंतांना
नमुद गोवंशाची अवैद्य रित्या वाहतुक करीत असतांना मिळुन आले. या प्रकरणी पो. स्टे पांढरकवडा येथे गुन्हा नोंद करण्याची
कार्यवाही सुरु आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक कुमार चिंता, उपविभागीय पोलीस अधिकारी, पांढरकवडा रामेश्वर बैंजणे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सतिश चवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोहवा उल्हास कुरकुटे, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, पो. ना. सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, पो को रजणिकांत मडावी, चालक पोलीस नायक सतिश फुके यांनी केली.
0 Comments