लाचखोर सहाय्यक अभियंत्यास रंगेहात पकडले

मिटर बसविण्यासाठी घेतली पाच हजाराची लाच

यवतमाळ : विज मिटर बसविण्यासाठी शासकीय शुल्का व्यतीरिक्त पाच हजार रुपयाची लाच मागणा-या महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यासह रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळच्या पथकाने आज गुरुवारी ३० जानेवारी रोजी राळेगाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कर्यालयात केली.

जगदीश श्रीराम ढुमणे, वय ४५ वर्ष, पद सहाय्यक अभियंता, वर्ग २. नेमणुक उप-कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत उप-विभाग राळेगांव असे लाच घेतांना पकडलेल्या अधिका-यांचे नाव आहे. तक्रारदारांनी दि. २९ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळ येथे जगदीश ढुमणे सहाय्यक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत उप-विभाग राळेगांव यांनी लाचेची मागणी केल्याची लेखी तक्रार दिली होती. त्यावरुन एसीबीच्या पथकाने ३० जानेवारी रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. ढुमणे यांनी घरात लाईनचे मिटर बसविण्याकरीता शासकीय शुल्क व्यतिरिक्त स्वतः करीता ५ हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. त्यावरून सापळा रचुन सदर सहायक अभियंत्यास रंगेहात पकडले. याप्रकरी पोलीस स्टेशन राळेगाव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.

सदरची कार्यवाही. मारूती जगताप, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, सचीद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, अमरावती, पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे, अॅन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, पोलीस अंमलदार पोहवा अतुल मते, अब्दुल वसीम, पौना सचीन भोयर, सुधीर कांबळे, राकेश सावसाकडे, गोवर्धन वाढई व चालक श्रेणी पोउपनि संजय कांबळे यांनी केली.

Post a Comment

0 Comments