यवतमाळ : नागुपर ते पांढरकवडा राष्ट्रीय महामार्गावरुन
हैद्रबाद येथे कतलीसाठी गोवंशीय जनावरे घेवून जात असल्याची
खबर पोलिसांना लागली होती. त्या आधारे पोलिसांनी वाराकवडा या गावाजतवळ सापळा रचला
होता. पोलिसांनी गोवंश घेवून जाणा-या वाहन चालकाला वाहन थांबविण्याचा इशारा केला.
यावेळी ट्रक थांबवून चालक व त्याच्या दोन साथीदार शेतातून पसार झाले. पोलिसांनी ५६
गोवंशाची सुटका केली असून, ट्रकसह ४३ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
२१ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत होते. अशातच काही इसम नागपूर ते पांढरकवडा येणा-या राष्ट्रीय महामार्गावरुन
हैद्रबाद येथे एका ट्रकमधून गोवंशीय जनांवरांची कत्तली करीता तस्करी करनार असून, ट्रकचे काच
फुटल्याची माहीती मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी वाराकवठा गावाजवळ हायवे रोडवर सापळा रचला. एम. एच.२९ बि.ई. ४३४ क्रमांकाच्या ट्रक चालकाला वाहन थांबण्याचा इशारा केला. मात्र ट्रक चालकाने त्याचे ताब्यातील
ट्रक रोडवरतीच थांबवुन ट्रक चालक व त्याचे दोन साथीदार खाली उतरून
शेतामध्ये पळुन गेले. पो. स्टाफने त्यांचा पाठलाग केला परंतु ते मिळुन आले नाही. पोलिसांनी
५६ गोवशीय बैल जातीचे जनावराची सुटका करुन रासा येथील
गोरक्षण संस्थेत जमा करण्यात आले.
५६ गोवंशाची सुटका ; तीन जणांवर गुन्हा
पोलीस स्टेशन पांढरकवडा हद्दीतील वारा गावाजवळ हैद्राबाद कडे कतली
करीता जाणारे एकूण ५६ गोवंशीय गोरे व बैल किंमत १३
लाख ६० हजार रुपये व एक ट्रक किंमत ३० लाख रुपये
असा एकूण ४३ लाख ६० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तिन्ही आरोपीता विरुद्ध पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे प्राण्यांना कुरतेने
वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ११: (१), (घ), (ङ), (च), (ज), (ट) (८), (झ) महाराष्ट्र प्राणी
संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ कलम ५ (अ), (१). व५ (२) (ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
कारवाई करणारे पथक
सदर कार्यवाही डॉ.
कुमार चिंता, पोलीस अधीक्षक, पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, रामेश्वर वेजने, उपविभागीय पोलीस
अधिकारी, उपविभाग, पांढरकवडा, सतीश चावरे, पोलीस निरीक्षक, स्थानीक गुन्हे
शाखा, यवतमाळ यांचे मार्गदर्शनात PSI धनराज हाके, HC उल्हास कुरकुटे, NPC निलेश निमकर व पांढरकवडा पोलिसांनी केली.
0 Comments