एपिआय संतोष मनवर यांची एलसीबीत एन्ट्री

एपिआय कैलास भगत बिटरगावचे ठाणेदार 
जिल्हा पोलीस दलात तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या


यवतमाळ : जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.  यामध्ये बिटरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार एपीआय संतोष मनवर यांची एलसीबी ( स्थानिक गुन्हे शाखा) येथे बदली करण्यात आली. तर  उमरखेड पोलीस स्टेशनचे एपीआय कैलास भगत यांची बिटरगाव पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली. एलसीबीचे एपीआय सुगत पुंडगे यांची वसंत नगर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आज दिनांक 28 जानेवारी रोजी बदलीचे आदेश काढले. प्रशासकीय कारणास्तव ह्या तात्पुरत्या स्वरूपात बदल्या केल्याची सदर आदेशात नमूद केले आहे. यवतमाळ जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्र पोलीस कायदा-१९५१ मधील कलम २२ (न) नुसार, यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील खालील नमूद पोलीस अधिकारी यांच्या, त्यांच्या नावासमोर दर्शविण्यात आल्याप्रमाणे प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरुपात बदल्या नेमणूका करण्यात येत आहेत. 

बदली,नेमणूक करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी यांनी तात्काळ त्यांचे नेमणूकीचे ठिकाणी हजर होऊन अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावा. तसेच त्यांनी त्यांचेकडे प्रलंबित असलेले गुन्हे, तपास, अकस्मात मृत्यु, अजं चौकशी इत्यादी प्रकरणाची कागदपत्रे केस डायरीसह संबंधितांकडे हस्तांतरित करण्याची दक्षता व खबरदारी घ्यावी. असे आदेशात नमूद केले आहे. 

यापूर्वी एपीआय संतोष मनवर हे स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. त्याना यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगाराची इतंभूत माहिती आहे. त्यांनी अनेक दमदार कामगिरी केली असून अनेक गुन्हे उघडकीस आणले होते. पुन्हा नव्याने एलसीबी नियुक्ती झाली आहे. त्यामुळेच अनेक गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. 


Post a Comment

0 Comments