अन्नाच्या शोधात भ्रमंती, कोसदणी घाटातील घटना
यवतमाळ : अज्ञात वाहनाने बिबट्याला चिरडल्याची
घटना नागपूर-तुळजापूर महामार्गावरील कोसदणी घाटात बुधवारी दि २२ जानेवारी रोजी
रात्री १०.२६ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह वनविभागाच्या
अधिका-यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करुन मृत बिबट्याला आर्णी येथील वनपरिक्षेत्र
कार्यालयात नेले. आज गुरुवारी २३ जानेवारी रोजी वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले.
उत्तर आर्णी परिक्षेत्रातील लोणबेहळ बिट कक्ष
क्रमांक ११ मध्ये अंदाजे चार ते पाच वर्षाचा बिबट भ्रमंती करत होता. नागपूर – तुळजापूर
महामार्गावर अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती
की बिबट जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच सहा. वनसरक्षक दादासाहेब तौर, नितीन वानखडे वनपरीक्षेत्र
अधिकारी, विश्व्म्बर जाधव क्षेत्र सहाय्य्क लोणबेहळ, गौतम बरडे वनरक्षक, निलेश चव्हाण वनरक्षक, आकाश मोरे, उद्धव बुद्धवन्त, लक्ष्मण भिसे, पुंडलिक खत्री, पशुवैद्यकीय
अधिकारी, डॉ. अरुण आडे, पोलीस
कर्मचारी अतुल पवार, जमादार अरुण पवार, मानद वन्यजीव रक्षक श्याम जोशी, सतीश इंगोले
वनरक्षक, विनोद मस्के, मयूर पाळेकर, संतोष राठोड, संजय माहूरकर, प्रदीप भिमटे, कामेश भोयर, अतुल येनेवार, रामकृष्ण लांडे, लोणबेहळ येथील पोलीस पाटील, सरपंच यांनी
घटनास्थळ गाठले. वनअधिका-यांनी पंचनामा करुन मृत बिबट्याला आर्णी वनपरीखेत्र
कार्यालयात पाठविले.
इनकॅमेरा शवविच्छेदन
अन्नाच्या शोधात भ्रमंती करीत असलेल्या बिबट्याला कोसदणी घाटात काल रात्री अज्ञात वाहनाने जोदार धडक दिली. त्यामध्ये सदर बिबट्याचा मृत्यू झाला असून, गुरुवारी २३ जानेवारी रोजी डॉ. मेहरे व डॉ अरुण आडे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर लोणबेहळ येथे बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर कारवाई इनकॅमेरा करण्यात आली.
प्रक्रीया पार पाडणारे वनअधिकारी
यवतमाळ वनविभागाचे उपवनसंरक्षक धनंजय वायभासे याच्या मार्गदर्शनात दादासाहेब तौर सहा. वन संरक्षक
रो. ह. यो. वन्यजीव यवतमाळ, वनपरीक्षेत्र अधिकारी नितीन वानखडे
यांच्यासह अन्य वनअधिकारी, कर्मचा-यांनी संपुर्ण प्रक्रिया पार
पाडली आहे.
0 Comments