यवतमाळ : शहरातील अवधूतवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या
गुन्ह्यातील मोबाईल घेवून फिरणा-या तीन चोरट्यांना अटक केली. तर एका विधीसंघर्ष
बाल गुन्हेगाराला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दहा मोबाईल व एक दुचाकी असा २ लाख
६२ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शिवम ऊर्फ लाड्या कैलास चलपेलवार वय १९ वर्ष रा. सुराणा ले-आऊट यवतमाळ, आशिष ऊर्फ भुषण संतोष चचाणे वय १९ वर्ष रा. नवप्रभात चौक, माळीपुरा, यवतमाळ, दर्शन हरीलाल बकोरीया वय २० वर्ष रा. सुरणा ले-आऊट, यवतमाळ, १ विधीसंघर्षग्रस्त बालक अशी आरोपींची नावे आहे. दि. २१ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे
शाखेचे पथक पो. स्टे. यवतमाळ शहर व अवधुतवाडी परिसरात आरोपी शोध व पेट्रालींग करीत
होते. यावेळी पो. स्टे अवधुतवाडी अप. क्र. ८२/२०२५ कलम ३०९ (४), ३ (५) भारतीय
न्याय संहिता अन्वये नोंद जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मोबाईल घेवून आरोपी फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी सापळा
रचुन आरोपींना अटक केली. त्याच्या अंग झडतीत १० मोबाईल व गुन्ह्यात वापरलेले
मोपेड वाहन असा एकुण २,६१,०००/- रु. चा
मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील
कारवाई करण्यासाठी अवधुतवाडी पो. स्टे. यांचे ताब्यात देण्यात
आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक
पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी
यवतमाळ दिनेश बैसाने, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे
शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांच्या
मार्गदर्शनात सपोनि सुगत पुंडगे, पोलीस उपनिरीक्षक गजानन
राजमल्लु, सफौ योगेश गटलेवार, सफौ सै. साजिद, पोहवा अजय डोळे, पोहवा रुपेश
पाली, पोहवा योगेश डगवार, पोहवा विनोद राठोड, पोहवा रितुराज
मेडवे, पोशि सलमान शेख, पोशि आकाश सहारे, पोशि देवेंद्र
होले, पोशि आकाश सुर्यवंशी यांनी केली.
0 Comments