यवतमाळ : विद्यार्थी घेवून
जाणारी स्कुलबसने झाडाला धडक देवून स्कुलबस पलटी झाली. या घटनेत एक विद्यार्थीनी
ठार झाली असून, १६ विद्यार्थी जखमी झाले. ही घटना आज २५ जानेवारी रोजी सकाळी ८
वाजताच्या सुमारास उमरखेड तालुक्यातील पळशी फाट्यावजळ घडली.
महिमा अप्पाराव सरकाटे वय १४ वर्ष
रा. दिवट पिंपरी असे मृतक विद्यार्थीनीचे नाव आहे. ती स्टुडंट वेल्फेअर
इंग्लिश मीडियम स्कूल दहेगाव येथे नवव्या वर्गात शिक्षण घेत होती. एम एच २९ / एम ८४८८ क्रमांकाच्या स्कूल बसमधून दररोज या शाळेत
शिक्षण घेणारे कळमुला, दिवटपिंपरी, पोफाळी, जणूना, तरोडा, कूपट्टी या गावातील
विद्यार्थी दररोज प्रवास करतात. नेहमी प्रमाणे आज
२५ जानेवारी रोजी सकाळी सदर स्कुलबस विद्यार्थी प्रवास करीत होते. अंबाळी
फाटा ते पळशी फाटा दरम्यान उमरखेड कडे येणा-या स्कूलबस चालकाचा ताबा सुटल्यामुळे
बस झाडावर आढळून पलटी झाली. सदर बस मध्ये जवळपास २५ शालेय विद्यार्थी प्रवास करीत होते. या अपघातात इयत्ता
नववी मध्ये शिकणारी विद्यार्थीनी महिमा अप्पाराव सरकाटे हिच्या
डोक्याला जबर मार लागल्याने तीचा मृत्यू झाला. तर १६
विद्यार्थी जखमी झाले. यावेळी नागरिकांनी विद्यार्थ्यांना
बसमधून बाहेर काढून रुग्णालयात पाठविले. जखमी विद्यार्थ्यांना राजाराम प्रभाजी उत्तरवार उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर काही विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते. बसमधील विद्यार्थी
भयभीत झाले होते.
जखमी विद्यार्थी : अथर्व धनंजय कनवाळे रा. कळमुला, मीत सुनील ठाकरे रा. पोफाळी, समर्थ सूर्यकांत सराने रा. पोफाळी, अनया आशिष चव्हाण रा. हातला, आयुष शंकर नरवाडे रा दिवट पिंपरी, अनुश्री निरंजन पाईकराव रा. पोफाळी, कृष्णा शिवाजी लडके रा. कळमुला, काव्या संभाजी हुडेकर रा. पोफाळी, आरुषी सचिन राठोड रा. जनूना, प्रगती शरद लडके रा. कळमुला, श्रद्धा विजय राठोड रा. जनूना, दिशा सुरेश कनवाळे रा. कळमुला, आर्यन दत्तराव वाघमारे रा. कळमुला, कार्तिक पुरुषोत्तम कनवाळे रा. कळमुला, सोहम किरण कनवाळे रा. कळमुला, राम संदीप लडके रा. कळमुला.
एसडीपीओंची घटनास्थळाला भेट
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी
हनुमंत गायकवाड, उमरखेडचे ठाणेदार शंकर
पांचाळ, परिवहन विभागाच्या पथकाने भेट देऊन घटनेचा आढावा घेतला. आ. किसन
वानखेडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन सर्व जखमींची विचारपूस केली. मृतक विद्यार्थिनी महिमा सरकाटेच्या वडिलांचे सांत्वन केले.
पालकमंत्र्यांनी दिले तपास करण्याचे निर्देष
या दुर्दैवी घटनेची पालकमंत्री संजय राठोड यांनी गंभीर दखल घेतली
आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना घटनास्थळावर त्वरित
सहायता पाठवून झालेल्या घटनेचा त्वरित तपास करण्याचे निर्देश दिले आहे. घटनेस जबाबदार
असलेल्या दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिले आहे. दरम्यान पालकमंत्र्यांनी घटनाग्रस्त विद्यार्थिनीच्या परिवाराची सांत्वना
केली आहे. याशिवाय जिल्ह्यातील शाळेंच्या सर्व स्कूल बसेसची तपासणी करण्याचे निर्देश
सुद्धा त्यांनी दिले आहे.
नवसाच्या ‘महिमा‘वर काळाचा घाला
अप्पाराव सरकाटे यांच्या लग्नानंतर तब्बल 12 ते 13 वर्षानंतर त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. प्रत्येक देवापाशी त्यांनी
आपल्याला मूल व्हावे म्हणून नवस केला. देवाने त्यांच्या नवसाला पावत कन्यारत्न दिले. आज झालेल्या स्कूल बसच्या अपघातामध्ये ‘महिमा‘वर काळाचा घाला घातला गेला. सदर अपघातामुळे सरकाटे
कुटुंबीयावर एकुलती एक मुलगी गमावल्याचे त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महिमाच्या जाण्यामुळे अवघ्या दिवटपिंपरी
गावावर शोककळा पसरली आहे.
0 Comments