डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली.

यवतमाळ : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणताच निर्णय होऊ न शकल्याने सभा पुढे ढकलण्यात आली. प्रारंभी प्रतिमा पुजन करून सभेला सुरुवात झाली तद्नंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काही नावे आली मात्र त्यावर सहमती होऊ न शकल्याने सभा दुसर्‍या दिवशी आयोजित करण्यात आली. पाटीपुरा येथील बाबासाहेबांची जयंती दरवर्षीच भव्य प्रमाणात साजरी केली जाते. अत्यंत उत्साहात जयंती मंडळाची कार्यकारिणी निवडली जाते. या सभेला पाटीपुरा, अशोक नगर, आंबेडकर नगर, अंबिकानगर, श्रावस्ती सोसायटी, रमाई पार्क, सेजल रेसिडेन्सी येथील नागरिक उपस्थित होते. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक अॅड. आनंद गायकवाड यांनी दिली. 


Post a Comment

0 Comments