पाटणबोरीत क्लबवर धाड : ३५ जणांवर कारवाई, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पाटणबोरी येथील सोशल क्लबवर एलसीबीच्या पथकाने धाड टाकली. या धाडीत ३५ जणांवर जुगार कायद्या अंतर्गत कारवाई केली असून, ३ लाख रोख रक्कमेसह ४५ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा पोलीस ठाण्या अंतर्गत येणा-या पाटणबोरी येथे  एक सोशल क्लब आहे. मात्र त्या ठिकाणी शासनाचे नियम धाब्यावर ठेवून सोशल क्लबच्या नावावर अवैधपणे जुगार चालविण्यात येतो. या सोशल क्लबवर महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यातील हायप्रोफाईल व्यक्ती जुगार खेळण्यासाठी येतात. नेहमी प्रमाणे काल रात्री जुगार खेळ सुरु होता. अशातच यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोशल क्लबवर धाड टाकण्यात आली. या धाडीत नगदी 2,96,090/- रुपये व मोबाइल, चार चाकी वाहन, 42,19,900/- रुपये 3600 रु की.ची विदेशी दारू असा एकुण- 45,19,590/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हे सोशल क्लब मध्ये आदेशाचे अटी व शर्तीचे उल्लंघन करून हारजितिचा खेळ खेळताना मिळून आले म्हणून त्यांच्यावर वरील कलमा  अन्वये पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे कारवाई करण्यात आली. वाय राजेशकुमार वाय सुंदरराव यादागिरी वय 52 वर्ष याच्यासह 34 जणांवर पांढरकवडा पोलीस ठाण्यात कलम 223 BNS R/w4,5 मुंबई जुगार अधिनियम R/w 65 (ई) म.दा.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांनी केली.

Post a Comment

0 Comments