पांढरकवडा - आमदारकीची शपथ घेतल्यानंतर आमदार राजू तोडसाम यांनी प्रथमतः केळापूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याचे संबंधित ठाणेदारांना आदेश दिले होते़. मात्र आमदारांचे आदेश झुगारून तालुक्यात अवैध सुरूच असून अवैध धंद्याला अक्षरश: उधाण आलेले आहे. आमदार राजू तोडसाम यांनी आदेश देऊनही परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार,अवैध धंदे, मटका काउंटर खुलेआम सुरू आहे. याकडे हेतूपुरस्कर पांढरकवडा ठाणेदाराचे दुर्लक्ष होत आहे़. पांढरकवडा तालुक्यातील रुंझा, मोहदा, करंजी, उमरी, पहापळ, पाटणबोरी या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. ग्रामीण भागात शेत शिवारामध्ये तीन पत्त्याचा परेल हा जुगार फोफावला असून या जुगारात लाखोंची उलाढाल होत आहे़ जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पांढरकवडा तालुक्यातील अवैध धंद्यांना मुकसंमती कुणाची? असा सवाल सर्वसामान्य नागरिकात उपस्थित होत आहे. पांढरकवडा शहरात पोलिसांची रात्रीची गस्त बंद झाली असून शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे व छोटे मोठ्या गुन्हेगारीच्या घटना घडत आहे़ आमदारांनी आदेश देऊनही कारवाई होत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे़ पांढरकवडा तालुक्यातील अवैध धंद्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना वारंवार सूचना देऊनही कारवाई शून्य होत असल्याने संताप व्यक्त होत आहे़
पांढरकवडा तालुक्यात व परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना माहिती दिली़ या परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार अवैध धंदे, मटका काउंटर सुरू असल्याचे पोलीस अधीक्षकांना सांगण्यात आले व कारवाई करावी अशी विनंती केली. मात्र अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई झाली नसल्याने याबाबत आता वरिष्ठाकडे दाद मागावी लागणार
राजू तोडसाम, आमदार केळापूर.
0 Comments