यवतमाळ : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोन तरुण जागीच ठार झाले.
ही घटना नागपूर-तुळजापूर महामार्गावरील महागाव-मुडाणा दरम्यान १७ जानेवारी रोजी रात्रीच्या
सुमारास घडली. धाब्यावरुन जेवन करून घरी परत येत असतांना युवकांवर काळाने घाला
घातला.
अर्जुन गजेंद्र देशमुख वय 19, अजय
सतीश विरखेडे वय 22 रा. वाकोडी असे मृतक तरुणांचे नाव
आहे. १७ जानेवारी रोजी सायंकाळी आपल्या मित्र सोबत एम .एच.२९ बी. डब्ल्यू
८९६९ या दुचाकीने उमरखेड रोडवरील धाब्यावर
जेवण्यासाठी गेले होते. जेवन
केल्यानंतर ते दुचाकीने घरी परत येत होते. अशातच मुडाणा- महागाव रस्त्यावरील सुरोशे
यांच्या शेताजवळ सुसाट वेगाने नांदेडकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जबरदस्त धडक दिली. ही घडक इतकी
भयानक होती की, त्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू
झाला. आज १८ जानेवारी रोजी सकाळी एका नालीत दोन मृतदेह व मोटर
सायकल आढळून आली. या घटनेची माहिती महागाव पोलीस व नातेवाईकांना देण्यात आली. या घटनेची
माहिती मिळताच महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे यांनी
घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह सवना येथील ग्रामीण
रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले.
घातपाताचा संशय
अपघातात मृत्यू झालेल्या दोन तरुणांनाचे मृतदेह नालीत आढळल्याने
नेमका अपघात झाला की, घातपात अशी शंका उपस्थित होत आहे. हा अपघात नसून, घातपात
असून शकतो असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्या दिशेने पोलिसांनी तपास करावा
अशी मागणीही जोर धरत आहे.
0 Comments