यवतमाळ : जिल्ह्यात सहकार क्षेत्रात झपाट्याने पतसंस्था,
निधी, अर्बन बँकेची संख्या वाढली आहे. अनेकांनी या क्षेत्रात पदार्पण केले आहे. अनेक
पतसंस्थेकडून नवीन शक्कल लढवुन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करण्याचा प्रयत्न
केल्या जात आहे. अशाच प्रकारे दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधी लि.च्या संचालक मंडळानेही
जास्त व्याज देण्याचे आमिष ग्राहकांना दाखवुन लाखो रुपयाच्या ठेवी मिळविल्या.
मात्र गेल्या एक महिण्यापासून मुख्य आरोपी प्रणित मोरे व बँकेचे
संचालक मंडळ गावातून पसार झाले. या बाबतची भनक बॅकेच्या ग्राहकांना लागताच त्यांनी
पैसे काढण्यासाठी रिंघ लावली होती. अखेर एका ग्राहकाने दिग्रस पोलीस ठाणे गाठून
तक्रार दिली होती. दिग्रस येथील जनसंघर्ष निधी लिमिटेडमध्ये ४४ कोटीच्यावर घोटाळा
झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची तपास
स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिनस्त आर्थीक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल होण्यापूर्वीच संचालक मंडळ पसार झाले होते. दरम्यान काल २
फेब्रुवारी रोजी रोजी पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पथक , एलसीबी
पथकाने संयुक्तरित्या तीन संचालकांना नागपूर येथून अटक केली. साहील अनिल
जयस्वाल, वय ३५ वर्ष,
अनिल रामनारायन
जयस्वाल, वय ६५ वर्ष,पुष्पा अनिल
जयस्वाल, वय ६० वर्ष सर्व रा. दिग्रस अशी अटक केलेल्या
संचालकांची नावे आहे. आज ३ जानेवारी रोजी दिग्रस पोलिसांनी तिन्ही आरोपीला
सत्र न्यायालय दारव्हा येथे हजर केले होते. यामध्ये आरोपी साहिल
जयस्वाल यांना १३ दिवसाची म्हणजे १५ जानेवारी २०२५ पर्यंत पोलीस कोठडी
सुनावली आहे. तर आरोपी अनिल जयस्वाल व पुष्पा जयस्वाल या दोंघांना १३
दिवसाची म्हणजे दि.१५ जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
अध्यक्षासह सात जणांवर गुन्हा दाखल : रजीया बानो अब्दुल रफीक,
वय ४९
वर्ष, रा. ताज नगर,
उस्मानिया
मस्जीदचे मागे, दिग्रस यांनी या घटनेची दिग्रस
पोलीस ठाण्यात फिर्यादी नोंदविली होती. त्यावरुन दिग्रस पोलिसांनी अपराध
कमांक ७४५/२०२४ कलम कलम ४२०,४०९,४०६,३४,
१२० (ब)
भादवी सहकलम ०३ एम.पी.आय.डी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये प्रणीत
देवानंद मोरे, वय ३५ वर्ष,
साहील
अनिल जयस्वाल, वय ३५ वर्ष,
प्रीतम
देवांनद मोरे, वय ३२ वर्ष,
अध्यक्ष, देवानंद लक्ष्मण
मोरे, वय ७५ वर्ष,
जयश्री
देवांनद मोरे, वय ७० वर्ष,
अनिल रामनारायन
जयस्वाल, वय ६५ वर्ष,
पुष्पा
अनिल जयस्वाल, वय ६० वर्ष सर्व रा. दिग्रस
जि. यवतमाळ याचे विरूध्द सदरचा गुन्हा नोंद केला आहे.
कारवाई करणारे पथक :सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक
पियुष जगताप याचे मार्गदर्शनाखाली रामेश्वर वेंजने उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा
व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील सपोनि विजय महाले पो. हे. कॉ सोहेल बेग मिर्झा,
पोना किशोर झेंडेकर, पोकों अमीत झेंडेकर, वाहन चालक जितेंद्र चौधरी, पोकॉ
अमीत कुमरे, पो. स्टे. वडकी, महीला पोलीस
अंमलदार किरण लोहकरे व काजल यांनी सायबर सेल यवतमाळ यांच्या तांत्रीक विश्लेषनाचे मदतीने
केली आहे.
0 Comments