यवतमाळ : एका युवकाने लॉजमध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उमरखेड
येथे ३० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
पवन साहेबराव इंगळे (२५) असे मृतकाचे नाव आहे. तो नंद लॉज मध्ये मॅनेजर असलेल्या वडिला जवळ दुपार दरम्यान
गेला होता. वडिल साहेबराव यांना घरुन जेवणाचा डब्बा घेवुन या तो पर्यंत मी लॉज सांभाळतो
असे त्याने सांगीतले होते. त्यामुळे वडिलाने त्याला जेवणाचा डब्बा
आणून दिला. त्यानंतर तो खोली नंबर २ मध्ये जेवण
करण्यासाठी गेला होता. सायंकाळ होवूनही तो परत न आल्याने वडीलाने आवाज
दिला परंतू काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर
लॉजच्या खोलीचा दरवाजा तोडून आत पाहीले असता पवन
याने बेडसिटच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले.
या घटनेची माहिती मिळताच उमरखेड पोलिसांनी घटनास्थळ गाठून
पंचनामा करुन मृतदेह रुगणालयात पाठवला. वृत्तलिहेपर्यंत आत्महत्येचे कारण कळू शकले
नाही.
0 Comments