कशासाठी करणार काँग्रेस आंदोलन

राष्ट्रीय मतदार दिनी पुकारला एल्गार

यवतमाळ : मतदारांच्या हक्कांसाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. यवतमाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान चौक बस  स्टँड येथे शनिवारी २५ जानेवारी २०२५ सकाळी १० वाजता हे आंदोलन होणार आहे. राष्ट्रीय मतदार दिनी एल्गार पुकारला आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या कृत्यां विरोधात, लोकशाहीचे रक्षण, मतदारांच्या हक्कासाठी दि. २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनी आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा संविधान चौक बस स्टँड यवतमाळ, येथे उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. 

विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आंदोलन 

राष्ट्रीय मतदार दिनी होणाऱ्या  आंदोलन मा. मंत्री विजय वडेट्टीवार व आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांसह, पदाधिकारी, तालुका, शहर, महिला, युवक, एन यु सी आय, सेवादल, जाती, जमाती, विविध आघाडीचे कार्यकर्ते सहभागी होणार आहे.

Post a Comment

0 Comments