ना. इंद्रनील नाईक यांची गोलंदाजी, माजी आ. ॲड. निलय नाईक यांची फलंदाजी

पुसद ( यवतमाळ) - ना. इंद्रनील नाईक यांनी गोलंदाजी करत माजी विधान परिषद सदस्य ॲड. निलय नाईक यांनी फलंदाजी केली. ना. इंद्रनील नाईक यांनी सुद्धा फलंदाजी करत सामन्याची सुरुवात करून दिली. सरपंच संघ विरुद्ध नगर परिषद शिक्षक संघ यांच्यामध्ये  सामना होऊन नगरपरिषद शिक्षक संघाने नाणे फेक जिंकून प्रथम फलंदाजी करीत षटकांमध्ये 69 रन काढले होते. तर सरपंच संघाने अवघ्या चार षटकामध्ये नगर परिषद शिक्षक संघाची आव्हान संपुष्टात आणले.

पत्रकार क्रिकेट क्लब पुसद तर्फे पत्रकार चषक 2025 च्या सामन्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन  कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक माजी आमदार निलय नाईक हे उपस्थित होते. 10 जानेवारी रोजी सामन्यांचे उद्घाटक राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष निलय नाईक माजी विधान परिषद सदस्य हे होते. प्रमुख पाहुणे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, गट विकास अधिकारी संजय राठोड, डॉक्टर सतीश चिदरवार, वकील संघाचे सचिव वीरेंद्र राजे, अनिरुद्ध पाटील चोंढीकर, प्रज्ञापर्वाचे माजी अध्यक्ष विठ्ठल खडसे, सोनी ऑटोमोबाईल चे संचालक धनंजय सोनी, उपाध्यक्ष भाजपा व्यापारी संघ रवी ग्यानचंदानी, पुसद पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अनिल चेंडकाळे, जेष्ठ  पत्रकार दिनकर गुल्हाने, ललित शेता, दीपक महाडिक, गणेश राठोड, जियासिक सय्यद जाने माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भोसले, सामाजिक कार्यकर्ता विजय भेलके, रवी तायडे, लियाकत अली पठाण आदी मान्यवर या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते.

सामन्यांचे उद्घाटन करून सरपंच संघ विरुद्ध नगर परिषद शिक्षक संघ या सामन्याचा मंत्री महोदयाच्या हस्ते नाणेफेक करून नगरपरिषद शिक्षक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरू होण्यापूर्वी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी गोलंदाजी केली. माजी विधान परिषद सदस्य ॲड. निलय नाईक यांनी फलंदाजी केली. ना. इंद्रनील नाईक यांनी सुद्धा फलंदाजी करत सामन्याची सुरुवात करून दिली. सर्वप्रथम सामना सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीताने सामन्याची सुरुवात करण्यात आली सरपंच संघ विरुद्ध नगर परिषद शिक्षक संघ यांच्यामध्ये  सामना होऊन नगरपरिषद शिक्षक संघाने नाणे फेक जिंकून प्रथम फलंदाजी करीत षटकांमध्ये 69 रन काढले होते तर सरपंच संघाने अवघ्या चार षटकामध्ये नगरपरिषद शिक्षक संघाची आव्हान संपुष्टात आणले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. निलय नाईक यांनी व प्रमुख पाहुण्यांनी सामन्याचा आनंद घेतला. क्रिकेटच्या यशस्वी आयोजनाबद्दल पत्रकार क्रिकेट क्लब पुसदच्या सर्व आयोजकांची माजी आमदार निलय नाईक यांनी कौतुक केले. संचालन पत्रकार क्रिकेट क्लबचे मार्गदर्शक बाबाराव उबाळे यांनी केले. प्रास्ताविक आयोजक विनय राठोड यांनी केले. तर आभार क्रिकेट क्लबचे कार्याध्यक्ष बाबा खान यांनी मानले. चार दिवशी होणाऱ्या क्रिकेटचे सामन्याचे यशस्वी आयोजनासाठी पत्रकार क्रिकेट क्लबचे अध्यक्ष मारुती भस्मे, सचिव विजय नखाते, मनीष दशरथकर, उपाध्यक्ष विनयकुमार राठोड, ऋषिकेश जोगदंडे कार्याध्यक्ष बाबा खान, प्रकाश खिल्लारे सदस्य मोबसिर शेख, हनीफ शेख, राजू सोनुने, शारीक शेख, अनिल चव्हाण, विनोद गारोळे, लक्ष्मण कांबळे, पवन चव्हाण, शब्बीर शेख, तसेच प्रमुख मार्गदर्शक बाबाराव उबाळे, एडवोकेट अनिल ठाकूर व रवी देशपांडे यांनी परिश्रम घेतले. 

Post a Comment

0 Comments