शिर्डी येथे होणार आंतरराष्ट्रीय सहकार परिषद

 यवतमाळ जिल्हयातून १ हजार प्रतिनिधी जाणार 

यवतमाळ : युनो या आंतरराष्ट्रीय संघटनेने २०२५ हे वर्ष सहकार वर्ष म्ह‌णून घोषीत केले आहे. याचे औचित्य साधुन महाराष्ट्र शासनाचा सहकार विभाग, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, मल्टीस्टेट सोसायटी फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ८ व ९ फेब्रुवारीला शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजन केली आहे. या परिषदेला यवतमाळ जिल्हयातून पतसंस्थांचे १ हजार प्रतिनिधी जाणार आहे. अशी माहिती राज्य पतसंस्था फेडरेशनचे मुख्य समन्वयक राजुदास जाधव यांनी दिली.

यवतमाळ येथील विश्रामगृहात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात २० हजार पतसंस्था असे. या पतसंस्थेची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या पुढाकारात शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन ८ व ९ फेब्रुवारी रोजी केले आहे. जगभरातील १६ देश, ६ राज्याच्या सहकार विभागाच्या व पतसस्था चळवळीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. ८ फेब्रुवारीला १६ देशातील परदेशी पाहुणे, विविध ६ राज्यातील प्रतिनिधी, हाराष्ट्रातील सहकार विभागाचे ५० अधिकारी, पतसंस्था चळवळी मधील ५० महीला व ५० युवक अशा निवडक २०० प्रतिनिधीच्या उपस्थितीत पतसंस्था चळवळीबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. परदेशामध्ये वसुलीबाबत असलेले कठोर कायदे आपल्या महाराष्ट्रात जमलात आणण्याच्या दृष्टीने राज्य पतसंस्था फेडरेशन आग्रही भुमिका घेणार आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे सचिव निरज डफळे, संचालक अशोक जयसिंगपुरे, लुकमान आझम, लक्ष्मण घोटेकर, धनराज मोहोड आदी उपस्थित होते.

खुली सहकार परिषद होणार

९ फेब्रुवारीला सकाळी ९.०० वाजता महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीतील १५ हजार प्रतिनिधीच्या उपस्थितीत खुली सहकार परिषद होणार आहे. या परिषदेला देशाचे सहकारमंत्री अमित शाहा, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, सहकार सचिव राजगोपाल देवरा, सहकार आयुक्त दिपक तावरे यांचेसह अनेक मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार असुन या परिषदेचे स्वागत अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असणार आहे. या परिषदेत पतसंस्थांसमोर असणाऱ्या विविध समस्यांबाबत राज्य फेडरेशनच्या वतीने आग्रही भुमिका घेऊन पतसंस्था चळवळ अधिक बळकट करण्याचे दृष्टीने केंद्र व राज्य शासनासमोर साकडे घालण्यात येणार आहे अशी माहिती राजुदास जाधव यांनी दिली.

३० जानेवारीला सहकार दिंडी यवतमाळात

महाराष्ट्राच्या अर्थकारणामध्ये पतसंस्था चळवळीची भुमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे. पतसंस्थांचे कार्य व उतसंस्थांच्या योजना सर्व सामन्य लोकांपर्यंत पोहचाव्या या दृष्टीने राज्ञ। पतसंस्था फेडरेशनने दोन सहकार दिंडयांचे आयोजन केले आहे. एक दिंडी मुंबईवरून निघणार असुन दुसरी दिंडी नागपुरवरून निघणार आहे. नागपुर वरून निघणारी सहकारी दिंडी २९ फेब्रुवारीला यवतमाळ येथे मुक्कामी येत असुन ३० जानेवारीला ही दिंडी सकाळी ९ वा. सहकार भवान पासुन निघणार असुन दुपारी १ वाजेपर्यंत शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करून दिंडी पुढे रिसोडसाठी रवाना होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमासाठी यवतमाळ जिल्हयातील पतसंस्थांचे अध्यक्ष, संचाल, अधिकारी, कर्मचरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे असेही जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजुदास जाधव यांनी सांगीतले.

Post a Comment

0 Comments