महिला शेतकरी शुभांगी झिलपे यांचा कृषीरत्न समता पुरस्काराने सन्मान


यवतमाळ - येथील तरुण महिला शेतकरी शुभांगी पुंडलिकराव झिलपे यांना राष्ट्रीय साहित्य परिषदेच्या कृषी रत्न समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कृषी क्षेत्रामध्ये काळ्या गव्हाच्या उत्पादनाची अतुलनीय कामगिरी तसेच समाजकार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार मुंबई येथे कार्यक्रमात देण्यात आला. 

सदर पुरस्कार आमदार अशोक माने, अभिनेता अर्जुन यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या स्नेहा देशपांडे, समता साहित्य अॅकादमीचे अध्यक्ष डी.एस.दांडेकर आदी उपस्थित होते. उच्च्चशिक्षित असलेल्या शुभांगी झिलपे यांनी यवतमाळ येथे आश्चर्यकारक अशा काळया गव्हाचे उत्पादन केले आहे. आई-वडीलांचा सांभाळ करत त्या गेल्या पाच वर्षापासुन स्वतः शेती करीत आहे. पालकांच्या खांद्यावरची जबाबदारी तसेच सामाजिक कार्यासाठी त्या जाणिवपूर्वक अविवाहीत राहिल्या. पुण्यात त्यांनी त्यांचे पदव्युत्तर पदविचे शिक्षण पुर्ण केले आहे. त्यानंतर फुड प्रोसेसिंगचे प्रशिक्षण त्यांनी घेतले.  समाजामध्ये एक महिला शेतकरी म्हणून त्यांची आपली ओळख निर्माण केली आहे. त्या भारतीय किसान संघटनेमध्ये महिला समन्वयक म्हणून कार्यरत आहे. भारतीय किसान संघटनेत जिल्हा कार्यकारिणी मंत्री म्हणुन त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.  त्यांचा शेतीतील प्रवास तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्या समाजकार्यामध्ये देखील अग्रेसर असतात. श्री. भगवान विश्वकर्मा सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून त्या विविध समाजोपयोगी स्पर्धा आयोजित करीत असतात.

Post a Comment

0 Comments