कारच्या धडकेत पाणीपुरी विक्रेता ठार; पाच जण जखमी

यवतमाळ : भरधाव कारने पाणीपुरीच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात पाणीपुरी विक्रेता जागीच ठार झाला. तर कारमधील पाच जण जखमी झाली. ही घटना पांढरकवडा तालुक्यातील चालबर्डी येथे बुधवारी ८ जानेवारी २०२५ रोजी रात्री ८:३० ते ९ वाजताच्या सुमारास घडली.

रामजनक बाबुराम बघेल वय ४१ वर्ष रा. अमायन बडी पटटी ता. मेहगाव जिल्हा भिंड राज्य मध्यप्रदेश ह. मु. राम नगरी पांढरकवडा असे मृतक पाणीपुरी विक्रेत्याचे नाव आहे. तर कार मधील रघुनाथ बापुराव कोवे, सुरेद्र विष्णु नैताम, युवराज प्रकाश पेन्दोर, अंकुष उमेष कोवे, जय प्रकाष पेन्दोर, सर्व रा. महानडोळी जखमी झाले आहे. मृतक रामजनक बघेल हे ८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास चालबर्डी येथे पाणीपुरीची गाडी घेवून गेले होते. दरम्यान रात्री ८.३० वाजताच्या सुमारास एम. एच. ३४ बि. बि. ०९९८ क्रमांकाच्या कारने पाणीपुरीच्या गाडीला धडक दिली. या अपघातात पाणीपुरी विक्रेता जागीच ठार झाले. तर कारमधील पाच जण जखमी झाले असून त्याच्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी विवेक माधवर्सिंग बघेल वय ३६ रा. राम नगरी पांढरकवडा यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन पांढरकवडा पोलिसांनी कार चालक नागेश्वर वसंता कोवे वय २७ वर्ष रा. साखरा ता. घाटंजी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

Post a Comment

0 Comments