स्वातंत्र दिना इतकेच प्रजासत्ताक दिनाचे महत्व

मृद व जलांधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ : २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या इतिहासात स्वातंत्र्य दिन जितका महत्वाचा आहे, तितकेच महत्व प्रजासत्ताक दिनाचे आहे. जगात सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जाते. ही आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब आहे असे प्रतिपादन मृद व जलांधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

यवतमाळ येथील समता मैदानात भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सातत्याने काम करत आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून केवळ 1 रुपयात शेतकऱ्यांना पिकाला संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात 7 लाख 99 हजार तर रब्बी हंगामात 1 लाख 49 हजार शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला. प्रधानमंत्री किसान योजना आणि याच योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने सुरु केलेली नमो किसान महासन्मान निधी योजना शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना ठरल्या आहे. यावर्षी या दोनही योजनेतून जिल्ह्यातील 2 लाख 85 हजार शेतकऱ्यांना 232 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले आहे. 2023 च्या खरीप हंगामात कापुस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर पर्यंत प्रति हेक्टरी 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील 3 लाख 42 हजार शेतकऱ्यांना 189 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहे. यावर्षी नैसर्गिक आपत्तीत शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आपण 267 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. ही रक्कम देखील लवकरच प्राप्त होऊन शेतकऱ्यांना वाटप केली जातील असेही ते म्हणाले. महात्मा ज्योतिराव फुले आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून 1 हजार 356 आजारांवर विनामुल्य उपचार केले जातात. जिल्ह्यात 82 हजार 580 रुग्णांवर या योजनेतून उपचार करण्यात आले. त्यासाठी 371 कोटी शासनाने उपलब्ध करून दिले आहे. ईमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनेतून 24 हजार कामगारांना 22 कोटी 33 लाखाच्या लाभाचे वितरण करण्यात आले. 38 हजार कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच तर 55 हजार कामगारांना गृहउपयोगी वस्तु संचाचे वाटप करण्यात आले.  जलजीवन मिशनमधून जिल्ह्यात 4 लाख 8 हजार कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आल्याचेही पालकमंत्री संजय राठोड म्हणाले.

 

Post a Comment

0 Comments