यवतमाळ - टीन पत्राचे काम करत असताना पाय घसरून पडलेल्या कामगाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुंज येथील नॅचरल शुगर साखर कारखान्यावर गुरुवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. याबाबत कारखाना प्रशासनाने दुजोरा दिला आहे. कामगार हा टीन पत्रे काम करणाऱ्या कंत्राटदराकडे कामगार असल्याची माहिती कारखान्याचे डेप्युटी जनरल मॅनेजर डी. एल कदम यांनी दिली.
मोहम्मद शहान (३०) रा.उत्तरप्रदेश असे मृतकाचे नाव आहे. तो गुरुवारी सकाळी ठरल्या प्रमाणे नॅचरल शुगर कारखान्यावरील टीन पत्र ठोकण्याचे काम करत होता. काम वरच्या मजल्यावर असल्याने खाली उतरताना तो पाय घसरून पडला. प्रथम सवना नंतर पुसद उपजिल्हा रुग्णालय येथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. पुसद येथे उत्तरनिय तपासणी करून त्याचा मृतदेह उत्तर प्रदेश मध्ये त्याची मूळ गावी पाठवण्यात आला आहे. नॅचरल शुगर साखर कारखाना हा महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत येतो. या घटनेची माहिती महागाव पोलिसांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे महागाव पोलीस स्टेशनला याबाबत कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती ठाणेदार धनराज निळे यांनी दिली.
0 Comments