राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य
यवतमाळ : दृष्टी नसतांनाही अतिशय प्रामाणिक जीवन घडविण्यासाठी प्रयत्न करुन प्रशासकीय सेवेत रुजु होवून जिल्हाधिकारी बनणघ्याचे ‘भूमिका’ नामक ११ वर्षीय विद्यार्थीनीचे स्वप्न आहे. संगणकीय जगात वाचन संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी ११ तास वाचन करणार आहे. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी ८ ते डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम ग्रंथालय दारव्हा रोड, यवतमाळ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भूमिका सुजित राय ही आठव्या वर्गात शिक्षण घेत असून, सलग अकरा 11 तास ब्रेल लिपीतील पुस्तकांचे वाचन करणार आहे. फक्त 14 वर्ष वयोगटामधील दिव्यांग मुलींनी सलग अकरा तास ब्रेल लिपी वाचण्याचा प्रयोग हा महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलाच प्रयोग आहे. यवतमाळच्या मातीत जन्मलेल्या आणि उरात उत्तुंगभरारी घेण्याची स्वप्न पाहणाऱ्या आपल्या लेकीला प्रोत्साहन देण्यासाठी व तिचे मनोबल वाढवण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0 Comments