यवतमाळ : स्थानिक जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील आठ विद्यार्थी अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी 2024 च्या परीक्षेत मेरीट आले आहे. या निकालात
संगणक अभियांत्रिकीतुन चार विद्यार्थी, विद्युत अभियांत्रिकीचे
दोन विद्यार्थी, यांत्रिकी अभियांत्रिकीचा एक विद्यार्थी व इलेक्ट्रानिक्स अॅण्ड
टेलिकम्यूनिकेशन मध्ये एक असे आठ विद्यार्थी मेरीट आले
आहे. विद्यार्थ्यांच्या या दैदीप्यमान यशाने महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा
तुरा रोवला गेला आहे. संगणक अभियांत्रिकीतील
तेजस पिल्लारे 9.07 सिजीपीए गुण घेवून प्रथम मेरिट, यशश्री गायकी
व त्रीवेणी राठोड 9 सिजीपीए गुण घेवून व्दितीय मेरिट तर सानिका पांडे 8.86 सिजीपीए गुण घेवून तृतिय मेरिट आली आहे. विद्युत अभियांत्रिकी विभागातील तनु
पटेल ही 8.71 सिजीपीए गुणाने व्दितीय मेरिट व निखिल नागोसे 8.60 सिजीपीए गुणाने तृतिय मेरीट आला आहे. यांत्रिकी अभियांत्रिकीतुन
विद्यार्थी गौरव श्रीवास्तव हा 8.64 सिजीपीए गुण घेवून
सहावा तर इलेक्ट्रानिक्स अॅण्ड टेलिकम्यूनिकेशन अभियांत्रिकीतुन हर्ष पाली हा 8.93 सिजीपीए गुण प्राप्त करत नववा मेरीट आलेला आहे.
दिक्षांत समारंभात होणार सत्कार
अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी 2024 च्या परीक्षेत मेरीट आलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या होणाऱ्या
दिक्षांत समारोहात प्रमाणपत्र देवुन सत्कार करण्यात येणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी
आपल्या यशाचे श्रेय सचिव डॉ. शितल वातीले, संचालक पवन वातीले, प्राचार्य डॉ.
विजय भांबेरे व प्राध्यापक वर्ग यांना दिले.
‘जंगदंबा’च्या वाट्याला सोनेरी क्षण !
या संस्थेतील अनुभवी प्राचार्य, प्राध्यापक वर्ग व प्रशासकीय मंडळाच्या मार्गदर्शनाने उन्हाळी 2024 च्या परीक्षेत जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील 8 विद्यार्थी विद्यापीठातुन मेरीट आले. त्यांनी महाविद्यालयाचे नाव उज्वल केले. महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता राबवीत असलेले विविध उपक्रम व त्यांच्यावर घेत असलेली मेहनत याचेच फळ आहे. त्यामुळे हा सोनेरी क्षण जगदंबा कुटंबाच्या वाट्याला आला असल्याची प्रतीकीया संस्थेचे सचिव डॉ. शितल वातीले यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांचे अभिनंदन
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संचालक पवन वातीले, प्राचार्य डॉ.
विजय भांबेरे, विभाग प्रमुख डॉ. विजय नेवे, डॉ. पराग ठाकरे, प्रा. धनश्री
पोहरे, प्रा. अमोल दुमणे, प्रा. सागर राऊत व सर्व
प्राध्यापक वृंदानी अभिनंदन केले.
0 Comments