शक्तीपीठाच्या समर्थनार्थ नांदेड येथे मोर्चा; भूसंपादन सुरु करण्याची शेतक-यांची मागणी
यवतमाळ : नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग होणार आहे. सर्व नागरिक, शेतकरी, व्यापाऱ्यांना नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग फायद्यांचा ठरणार आहे. मात्र काही राजकीय नेते आपल्या फायद्यासाठी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करीत असल्याचा आरोप शक्ती पीठ महामार्ग शेतकरी कृती समितीने केला आहे. या महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया त्वरित सुरू करावी अशी मागणीही जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या शक्तीपीठाच्या समर्थनार्थ दि. 27 जानेवारी रोजी नांदेड येथे बारा जिल्ह्यातील शेतकरी मोर्चा काढणार असल्याची माहिती विश्राम गृहात पत्रकार परिषदेत दिली.
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, यवतमाळ, आर्णी, महागाव आणि उमरखेड
तालुक्यातुन नागपुर - गोवा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. त्याकरिता भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ह्या भूसंपादन
प्रक्रियेला महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा
पूर्ण पाठींबा असून ही भूसंपादन प्रक्रिया त्वरित राबविण्यात यावी. खऱ्या शेतकऱ्यांचा
या महामार्गाला कोणताही विरोध नाही, शेतकऱ्यांच्या नावाखाली
काही स्वयंघोषित नेते मंडळी या प्रकल्पाला
विरोध करीत आहे. तसेच भूमिअभिलेख विभागामार्फत संपादित होणाऱ्या
सर्व जमिनींची मोजणी पुढील महिन्याभरात पूर्ण करण्यात यावी, नागपूर
- गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिर्नीचा मोबदला ठरवितांना
शेतकऱ्यांशी चर्चा करावी, बाजार भावा प्रमाणे मूल्यांकन काढुन
सरळ संमतीने आमच्या जमिनी हस्तांतरित करून घ्याव्या. अशी मागणी शक्ती पीठ महामार्ग शेतकरी कृती समितीने केली आहे. यावेळी पत्रकार
परिषदेला शक्ती पीठ महामार्ग शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष संजय ढोले,
गजानन आडे, विनोद ठाकरे, रामेश्वर जाधव, सुशील जयस्वाल, सिद्धार्थ कुळसंगे, सचिन माहुरे, शैलेश केशरवाणी उपस्थित होते.
शक्तीपीठाचा महामार्ग
वर्धा जिल्ह्यातील पवनार पासून निघणारा हा महामार्ग गोवा नजीक पत्रादेवी पर्यंत जाणार आहे. वर्धा, यवतमाळ जिल्ह्यानंतर मराठवाड्यातील आठ जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे.
0 Comments