सहकार दिंडीने वेधले यवतमाळकारांचे लक्ष; पालकमंत्र्यांनी दाखवली हिरवी झेंडी



यवतमाळ :  महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभाग व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने 9 फेब्रुवारीला शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद होत आहे. त्या दृष्टीने राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दोन सहकार दिंड्या निघालेल्या आहे. आज 30 जानेवारीला नागपूरहून निघालेली सहकार दिली यवतमाळात पोहचली होती. या सहकार दिंडीला पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी हिरवी झेंडे दाखवली. त्यानंतर सहकार दिंडीने यवतमाळ शहरात मार्गक्रमण केले. फटाक्यांची आतिषबाजी, हरिनामाचा जयघोष, सहकाराच्या घोषणांनी यवतमाळ शहर दुमदुमून गेले होते.

या दिंडीत महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा रथ, हरिपाठ मंडळ, विविध पतसंस्थांचे दहा रथ, मोटरसायकलस्वार महिला सर्वांनी फेटे व सहकाराचा दुपट्टा परिधान करून दिंडीत सहभाग घेतला. सहकार भवन ते संविधान चौक, हनुमान आखाडा, पाच कंदील चौक, गोधनी रोड, दाते कॉलेज चौक करीत ही दिंडी पुन्हा सहकार भवन वडगाव येथे पोहोचली. या ठिकाणी सहकार दिंडी सोबत आलेल्या पुणे येथील कलावृंदांनी सहकार या विषयावरील सुंदर नृत्य व पथनाट्य सादर केले. याप्रसंगी झालेल्या सभेला जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, राज्य फेडरेशनचे मुख्य समन्वयक राजुदास जाधव, संचालक सुदर्शन भालेराव, धनंजय तांबेकर आदींनी संबोधित केले. यवतमाळ जिल्हा फेडरेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्हा अर्बन बँकेचे अध्यक्ष नितीन खर्चे, जिल्हा फेडरेशनचे सचिव नीरज डफळे, संचालक प्रदीप झाडे, लक्ष्मण घोटेकर,दिगंबर जगताप, अशोक जयसिंगपूरे, लोकमान आजम, अर्चना माळवी, अजय दंडे, राम साखळे, अमोल बोदडे, रवी इंगळे, रवी महानूर आदी उपस्थित होते. सहकार क्षेत्रातील सर्व बँका, पतसंस्था यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन सहकार दिंडी प्रचंड यशस्वी केली.

Post a Comment

0 Comments