आरोपी म्हणतो पोलिसांना सांगु नका
दारव्हा शहरातील खळबळजनक घटना
यवतमाळ : सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरु आहे. शहरासह ग्रामिण भागातही थर्टीफस्ट निमित्त पार्टीचे आयोजन करण्याचे लोन पसरले आहे. दारव्हा शहरातील काही युवक व वयोवृद्ध इसमाने थर्टीफस्त निमित्त पार्टीचे आयोजन केले होते. पार्टी रंगात आली अन् मोबाईल चोरीचा विषय निघाला अन् वाद उफाळुन आला. यावेळी प्रतिक याने रामचंद्र नावाच्या वयोवृद्ध इसमाच्या पोटात लाथ मारली. त्यानंतर सदर इसम घरी परत गेल्यानंतर दुस-या दिवशी पोटात दुखत असल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर रामदास याचा मृत्यू झाला. त्यानंतर शवविच्छेदन केल्यानंतर मारहाण केल्याने रामचंद्र यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल दिला.
शेतात होती पार्टी
दि. ३१ डिसेंबर २०२४
रोजी नविन वर्षाचे स्वागत निमित्त दारव्हा शहरालगत असलेल्या प्रतिक रवि तायडे याचे
शेतात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत दारव्हा शहरातील बारीपुरा येथील प्रतिक तायडे, सिद्धार्थ नगरातील
रामचंद्र नारायण फुपरे व इतर तीन जन सहभागी झाले होते.
मोबाईल चोरीवरुन वाद उफाळला
पार्टी रंगात आल्यानंतर प्रतिक तायडे याने रामचंद्र
फुपरे यांचेवर मोबाईल चोरीचा आरोप आवला. शेतातील घराजवळ असलेल्या आंब्याच्या
झाडाखाली बेदम मारहाण करुन छातीत लाथ मारली. त्यानंतर रामचंद्र
फुपरे हे आपल्या सिध्दार्थ नगराच्या घरी निघुन गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी रामचंद्र
यांच्या पोटात असहय वेदना होत असल्याने त्यांच्या मुलाने त्यांना उपचारकामी उपजिल्हा
रुग्णालय दारव्हा येथे दाखल केले. तेथुन त्यांना यवतमाळ पुढील उपचाराकरिता रेफर करण्यात
आले. शासकिय जिल्हा रुग्णालय यवतमाळ येथे उपचार सुरु असतांना दिनांक २
जानेवारी २०२५ रोजी रात्री उपचारा दरम्यान मरण पावले. उपचार सुरु असतांना
यातील मृतक यांनी हा घटनाक्रम आपला मुलगा शंकर यास सांगितला होता.
आरोपी म्हणतो घटना पोलिसांना सांगू नका !
मयत रामचंद्र हे उपचार कामी दारव्हा रुग्णालय
येथे गेल्याचे समजताच आरोपी प्रतिक याने शंकर याच्याशी संपर्क साधुन उपचाराचा खर्च
पुरविण्याची तयारी दाखवुन यवतमाळ साठी वाहन उपलब्ध करुन देवुन नगदी १००० रुपये दिले.
याबाबत पोलीसांना काही ही माहिती न देण्याबाबत गळ घातली होती.
मुलाच्या तक्रारीसह पि.एम. अभिप्रायावरुन गुन्हा
मृतक रामचंद्र हे मयत झाल्यानंतर त्यांचा मुलगा
शंकर याने दारव्हा पोलीस स्टेशन गाठुन ठाणेदार विलास कुलकर्णी यांना हा घटनाक्रम सांगितला, ठाणेदार कुलकर्णी
यांनी स.फौ. लावरे, पो.शि. पंकज राठोड यांचेसह यवतमाळ येथे धाव
घेवुन जिल्हा रुग्णालय येथील वैदयकीय अधिकारी यांना घटनाक्रम सांगितला. त्यामुळे मृतक
रामचंद्र यांचे शवविच्छेदन वैदयकिय चमु मार्फत करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात वैदयकिय
अधिकारी यांनी मृतकाचा मारहाणीत झालेल्या अंतर्गत दुखापतीमुळे मृत्यु झाल्याचा स्पष्ट
अभिप्राय दिला. यावरुन शंकर रामचंद्र फुपरे याचे फिर्यादी वरुन आरोपी प्रतिक रवि तायडे
याचे विरुध्द खुनासह अनुसुचित जाती जमाती कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला.
आरोपी जेरबंद
रात्रीच उशीरा पोलीस निरिक्षक विलास कुलकर्णी व त्यांच्या पथकाने आरोपी प्रतिक रवि तायडे यास त्याचे शेतातुन ताब्यात घेतले. आज रोजी आरोपीस न्यायालयासमोर हजर करुन त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात येत आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली चिलुमुला रजनिकांत सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा, पोलीस निरिक्षक विलास कुलकर्णी, सहाय्यक फौजदार लावरे, बापुराव दोडके, अनुप मडके, पंकज राठोड हे करीत आहे.
0 Comments