यवतमाळ : शासनाने नायलॉन मांझा वर बंदी घातली आहे. मात्र बंदी आदेश झुंगारुन मांझाची सर्रास विक्री होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पतंग उडविण्यासाठी मांझाचा उपयोग करण्यात येतो. पतंगीचा मांझा अनेक दुचाकीचालकांचा गळा चिरला आहे. यवतमाळ शहरात अलीकडच्या काळात तीन घटना घडल्या आहे. यापुर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नायलॉन मांझाची ठोक विक्री करणा-या व्यापा-याच्या मुसक्या आवळ्या होत्या. त्यानंतर आज अवधुतवाडी पोलिसांनी प्रजापती नगर, राणाप्रताप नगर या ठिकाणी कारवाई करून नायलॉन मांझा विक्री करणा-या दोन इसमांना अटक केली. आनंद अशोक मोटवानी वय 46 रा. पुष्पकुंज सोसायटी यवतमाल याच्याकडून 2000 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर अशोक गणपतराव डगवाल वय 68 रा.प्रजापती नगर यवतमाळ याच्याकडून 3000 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास अवधुतवाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेश रणधिर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
The Menu of this blog is loading..........
0 Comments