अपघातात एक इसम ठार, सहा जण जखमी


यवतमाळ : गवंडी कामावरुन परत येत असतांना ऑटो व ट्रॅक्टरचा अपघात झाला. या अपघातात एका इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना बोरी अरब नजीक असलेल्या तपोना फाट्याजवळ सोमवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली.

श्रीधर शामराव सेलोकार (६०) रा. बोरी अरब असे मृतकाचे नाव आहे. २० जानेवारी रोजी सेलोकार व अन्य सहकारी गवंडी कामावरुन एम.एच.०४ / सी एम ३५७८ क्रमांकाच्या ऑटोने बोरी अरब येथे परत येत होते. वाटेतच तपोना फाट्याजवळ ऑटो व ट्रॅक्टरचा अपघात झाला. यामध्ये श्रीधर सेलोकार यांच्यासह सहा जण जखमी झाले होते. या अपघातात ऑटो चालक स्टेअरिंगमध्ये फसला होता. यावेळी नागरिकांनी चालकाला बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान श्रीधर सेलोकार याचा मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास लाडखेड पोलीस करीत आहे.

 

Post a Comment

0 Comments