शिक्षक भारतीच्या मागणीला यश
इयत्ता दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी केंद्रावरील
केंद्रसंचालक व पर्यवेक्षक बदलणे बाबत शिक्षण मंडळाने नवा पॅटर्न राबविण्याचा निर्णय
घेतला होता. नाशिक जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये व त्यापूर्वी धुळे जिल्ह्यात हा पॅटर्न
राबविला होता. परंतु त्यात अनेक त्रुटी निर्माण
होवून केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे हा निर्णय
कायम ठेवल्यास परीक्षा केन्द्रावर गोंधळ निर्माण होऊ शकतो असा आरोप शिक्षक भारतीने केला होता. विशेष म्हणजे इयत्ता दहावी
आणि बारावीच्या परीक्षांमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षकांना त्यांची शाळा सोडून अन्य
शाळांमध्ये केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक म्हणून काम करावे लागणार हा निर्णय म्हणजे
शिक्षकांवर अविश्वास दाखवण्याचा प्रकार होता.. परीक्षेच्या तोंडावर शाळा बदलीचे नियोजन
करणे आव्हानात्मक होते. परीक्षेच्या दरम्यान करावा लागणारा प्रवास यामुळे शिक्षकांचे
वेळेचे नियोजन कोलमडणार होते. त्यामुळे याविरुध्द शिक्षक भारतीने आवाज उचलताच शिक्षण
मंडळाने हा निर्णय रद्द केला आहे.
निर्णयाचे स्वागत
आजपर्यंत सर्वच परीक्षा शिक्षकांनी आपल्याच केंद्रात राहून यशस्वीरित्या
पार पाडल्या असतांना अचानक मंडळाने शिक्षकांवर अविश्वास दाखविने ही गंभीर बाब होती.
त्यामुळेच आम्ही सरकारच्या या निर्णायाचा विरोध केला. आमची मागणी समजून घेत शिक्षण
मंडळाने हा निर्णय रद्द केल्याने आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो अशी प्रतिक्रीया साहेबराव पवार जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती यवतमाळ यांनी दिली.
0 Comments