यवतमाळ : शासनाने नायलॉन
मांजावर प्रतिबंध घातला आहे. शहरासह जिल्ह्यात अनेक दुकानातून नायलॉन मांजाची विक्री
होतांना दिसत आहे. नायलॉन मांजामुळे अनेकांचा गळा कापल्याच्या घटनाही शहरात घडल्या
आहे. त्यामुळे नायलॉन मांजा वापर टाळण्यासाठी विद्यार्थ्यानी जनजागृती केली.
कृपाशंकर सिंह हिंदी शाळेमध्ये, श्रमिक बहुउद्देशिय
विकास संस्था यवतमाळ द्वारे नायलॉन मांजा विरोधी घोषवाक्य चित्रकला स्पर्धा घेण्यात
आली. यामध्ये विध्यार्थ्यांचा उत्सफूर्त प्रतीसाद मिळाला. सर्व मुलांनी मोठ्या उत्साहाने
सहभाग नोंदविला. शाळेमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला नायलॉन मांजा विरोधी
उपक्रम प्रभारी रविंद्र विरकर व अभिषेक यादव
प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी
नायलॉन मांजामुळे होणाऱ्या दुष्परिणाम विषयी विस्तृत माहीती दिली. या दोघांनी नायलॉन मांजा विरोधी उपक्रमाची सुरुवात
या शाळेतून केली. आज नायलॉन मांजाचा खुलेआम वापर केला जातो. त्यामूळे मनुष्य जिवित
हानी तसेच पशुपक्षांची जिवीत हानी होत आहे. शासनाने नायलॉन मांजा वर बंदी आणली आहे.
परंतू आपलेही कर्तव्य आहे की नायलॉन मांजा विरोधी जनजागृती करणे, या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका कांचन बोरकर
उपस्थित होत्या. सुत्रसंचालन संजय जाचक यांनी केले. शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी
उपस्थित होते. अभिषेक यादव यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजन कृपाशंकर सिंह हिंदी हायस्कूल यांनी केले
होते.
0 Comments