यवतमाळ : जिल्ह्याचे माजी पोलिस
अधीक्षक आणि सध्याचे कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय भास्कर दराडे
यांना पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. मुळ नाशिक येथील
संजय भास्कर दराडे हे 2005 च्या आयपीएसच्या बॅचमधील
अधिकारी आहे. परिविक्षाधीन कार्यानंतर
त्यांनी धाराशीव, यवतमाळ आणि नाशिक ग्रामीण
जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता
त्यांचे सूक्ष्म नियोजन वाखण्याजोगे होते. राजकीयदृष्ट्या संवेदनशील यवतमाळ जिल्ह्यात
2014 च्या विधानसभा निवडणुका, नाशिक ग्रामीणमधील
आंतरराज्य टोळीकडून 44 रायफल, रिव्हॉल्व्हर
आणि चार हजार जिवंत काडतुसासह महाराष्ट्रातील सर्वांत मोठा शस्त्रसाठा जप्त केला. नागपूर
एसीबीचे एसपी या नात्याने भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये सापळे आणि संवेदनशील चौकशीची
नोंद केली आहे. तर 2015 मध्ये नाशिक कुंभमेळा बंदोबस्त यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्याबद्दल
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना कौतुक पत्र दिले आहे. त्यांनी पूर्व विभागाचे
अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून जातीयदृष्ट्या संवेदनशील पूर्व मुंबईत प्रभावीपणे काम
केले. तर 2024 ची लोकसभा निवडणूक त्यांनी कोकण परिक्षेत्रात यशस्वीपणे हाताळली
आहे. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याची पावती म्हणून त्यांना राष्ट्रपती पुरस्कार
बहाल करण्यात आला आहे.
The Menu of this blog is loading..........
0 Comments