एलसीबीने ठोकल्या सहा आरोपींना बेड्या : चौघांना घेतले गोव्यातून ताब्यात
यवतमाळ : मौजमस्ती करण्यासाठी कोण काय करेल हे
सांगता येत नाही. सहा जणांच्या टोळक्याने चक्क फायनांस कंपनीच्या कर्मचा-यांच्या
डोक्यात मिरची पुड टाकुन लाखोंचा रुपयाचा मुद्दमाल लुटला. एवढेच नाही तर त्यांनी
लुटमार करुन थेट गोवा गाठले. त्या ठीकाणी मौज मस्ती करुन पैसे उडविले. स्थानिक
गुन्हे शाखा व लाडखेड पोलिसांनी तपासचक्रे फिरवुन तीन आरोपींना गोवा येथून तर अन्य
तीघांना विविध ठिकाणावरुन बेड्या ठोकल्या. कुणाल बापुराव चवरे वय 23 वर्षे रा. ईदीरा नगर, बाभुळगाव ता. बाभुळगाव, निखील बळीराम राऊत वय 19 वर्षे रा. बुटले ले-आऊट
पिंपळगाव ता. जि. यवतमाळ, अर्पीत दिपक ठोसरे वय 19 वर्षे रा. वार्ड क्र.
4 पिंपळगाव ता. जि. यवतमाळ, यश माणिकराव थुल
वय 23 वर्षे रा. कोठा (वेणी) ता. कळंब, संस्कार शरद चौधरी वय 18 वर्षे रा. यावली (मावली) ता. बाभुळगाव
(6) विवेक गजानन कोडापे वय 18 वर्षे रा. नागरगाव ता. बाभुळगाव
अशी आरोपींची नावे आहे. दि. 30 डिसेंबर 2024 रोजी फिर्यादी शुभम वसंतराव दर्यापुरकर वय 30 वर्षे रा. पिंपळगाव
यवतमाळ यांनी पो.स्टे. लाडखेड येथे फिर्याद
दिली. फिर्यादी व त्याचा मित्र हे भारत फायनन्स कंपनीत नोकरीवर
आहे. दिघोरी-कामठवाडा-चाणी येथील बचत गटाचे कलेक्शन करुन चाणी
ते यवतमाळ कडे परत येत होते. अशातच पो.स्टे. लाडखेड हद्दीतील
दारव्हा रोड लगत उमर्डा नर्सरी जवळ अज्ञात 6 ईसमांनी त्याना अडविले. शुभम दर्यापुरकर व त्याचे मित्राचे डोळ्यात मिरची
पावडर टाकली. त्यानंतर त्याच्या जवळील बंग मध्ये असलेले
रोख 1,70,000/- रु., 2 टॅब,2 बायोमॅट्रॅक मशिन असा
एकुण 1,87,335/- रु. चा मुद्देमाल जबरीने
हिसकावून नेला होता. या प्रकरणी पो.स्टे. लाडखेड येथे
अपराध क्रमांक 0639/2024 कलम 310 (2) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात
आला.लुटमार करुन गेले गोवा फिरायला
कुणाल चवरे रा. इंदीरा नगर बाभुळगाव याने त्याचे साथीदारासह मिळुन सदर गुन्हा
केला. सर्व आरोपी हे गुन्ह्यातील रकमेसह
गोवा येथे फिरायला गेल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली
होती. त्यावरुन पोलीस पथकाने गोवा येथे जावून आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी त्या
ठिकाणी चार आरोपींना ताब्यात घेतले. तर उर्वरीत आरोपींना वनवाशी मारुती
मंदीर आर्णी रोड येथे सापळा रचुन तांत्रीक व गोपनिय माहीती आधारे कौशल्यपुर्वक सहा
ईसमांना ताब्यात घेतले.
आरोपींनी दिली कबुली
आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्राच्या डोक्यात मिरचीपुड टाकुन पैसे
लुटल्याची कबुली दिली. चोरीच्या काही पैश्याने गोवा टुर केल्याची कबुली
दिली आहे. सदर आरोपीकडुन आज पावेतो केलेल्या तपासात गुन्ह्यातील
एकुण रक्कम 54,700/-
रु., एक टॅब 6000/- रु., एक बायोमॅट्रेक मशिन
2500/- रु. व गुन्ह्यात वापरण्यात आलेली मो.सा. 50,000/- तसेच 06 मोबाईल 49,000/- रु. असा एकुण
1,62,200/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपास पथक
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष
जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा चिलूमुला रजनिकांत, यांचे मार्गदर्शनात
एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश
चवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय महाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल हिवरकर, सहाय्यक
फौजदार सैय्यद साजिद, पोलीस अंमलदार बबलु चव्हाण, सोहेल मिर्झा, किशोर झेंडेकर, मिथुन जाधव, अमित झेंडेकर, अमित कुमरे, प्रणय ईटकर, प्रगती काबंळे, उमेश शर्मा, जयंता शेंडे, नितीन सलाम यांनी केली.
0 Comments