दोन राउंडसह देशी कट्टा जप्त : आरोपीस अटक

यवतमाळ : शहरातील नागसेन सोसायटील इसमाच्या घरून एक देशी कट्टा, दोन जिवंत राउंड जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज ही कारवाई केली. अब्दुल अनिस अब्दुल सत्तार, वय 41 वर्ष, रा नागसेन सोसायटी यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे.

आज मंगळवारी ७ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. आरोपीने त्याच्या राहते घरी अग्निशस्त्र लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन वरून त्याच्या घराची झडती घेवुन एक देशी बनवटीचेचे पिस्टल व दोन जिवंत राऊंड असा एकूण 54,000/- रू चा मुद्देमाल मिळाला. आरोपीला पोलीस स्टेशन यवतमाळ शहर यांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेका विनोद राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन यवतमाळ शहर पोलिसांनी 3/25 आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. 

ही कारवाई कुमार चिंता, पोलीस अधीक्षक, पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, सतिश चवरे पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांचे मार्गदर्शनात एपिआय सुगत पुंडगे, एपिआय अमोल मुडे, एएसआय सैय्यद साजिद, एएसआय योगेश गतलेवार, एएसआय बंडू डांगे, पो.कॉ. विनोद राठोड, अजय डोळे, योगेश डगवार, निलेश राठोड, प्रशांत हेडावू, सलमान शेख, देवेंद्र होले, आकाश सूर्यवंशी, आकाश सहारे यांनी केली.

Post a Comment

0 Comments