अन् दारूचे नशेत लावली घराला आग : गॅस सिलेंडरचा झाला स्फोट

यवतमाळ : नशा करी जिवनाची दुर्दशाअशी म्हण प्रचलित आहे. अशाच काहीसा प्रकार डोंगरगाव येथे घडला आहे. एका इसमाने दारुच्या नशेत चक्क आपले स्वत:च्या घराला आग लावली. त्यानंतर आगेने घराला कवेत घेतले अन् गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये घराचे छत उडाले असून, सुदैवाने जिवीत हाणी झाली नाही. ही घटना आज बुधवार दिनांक २९ जानेवारी रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.

डोंगरगाव येथे एका इसमाने आज बुधवारी दुपारी दारूचे नशेत घराला आग लावलीकाही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केलेघरात असलेल्या गॅस सिलेंडरने पेट घेतला. या घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी सदर इसमासह त्याच्या घरातील मंडळींना तात्काळ बाहेर काढलेयाच दरम्यान गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे सुदैवाने इसमाच्या घरातील सदस्यांचे प्राण वाचले. या घटनेची माहिती तहसील व पोलीसांना दिली. यावेळी तहसीलदार म्हस्केनायब तहसीलदार जी एम राठोड, ना. तहसीलदार एम एम कोल्हेतलाठी एम डी खोकलेग्रामसेवक पी पी देशमुखकोतवाल देवानंद फोकसे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

अवैध दारु बंद करण्याची मागणी

यावेळी गावकऱ्यांनी तहसीलदार व ठाणेदार यांच्याकडे गावातील अवैध गावठी दारू बंद करून कारवाई करण्याची मागणी केली. सदर घटनेचा पुढील तपास पोफळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार एस आय श्याम लांडगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल हर्षदीप पंडितकर, हेड कॉन्स्टेबल बोंबले करीत आहे.

Post a Comment

0 Comments