कारवर ‘पोलीस’ लिहुन ‘ते’ काय करणार होते

 गौळ परिसरात लुटमारीचा होता ‘डाव’
टोळीच्या आवळल्या मुसक्या

यवतमाळ : कारवर ‘पोलीस’ लिहुन असलेले वाहन रात्रीच्यावेळी रस्त्यावर उभे करण्यात आले. अंधाराचा फायदा घेवून कार उभी करुन लुटमार, चोरी करण्याचा ‘डाव’ त्यांनी आखला होता. मात्र गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाखी नजर या वाहनावर गेली. त्या कारवर पोलीस असलेली पाटी लागवुन असल्याचे दिसताच संशय बळावल्याने त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारमधील युवकांची कसुन चौकशी केली. मात्र त्यांनी उडवाउडविचे उत्तर दिले. त्यावरुन पोलिसांनी 20 लिटर डिझेल, एक पोलीस नावाची इंग्रजीमध्ये असलेला पाटी, तिन मोबाईल व गाडी असा एकूण 2,32,000/- रु चा मुददेमाल जप्त केली. पोलिसांनी या प्रकरणी सय्यद मुसबीर सय्यद जमील वय 25 वर्ष, शेख खालिद शेख नूर वय 25 वर्ष,  सलीम खान करीम खान वय 27 वर्ष, सर्व रा.डोंगरगांव ता. महागांव याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोफाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कावाई केली आहे.


रेती तस्करीचे वाहन जप्त

अवैध रेती चोरी वाहतुक करणारा टिपर क्रमांक MH-26-H-6670 पकडून एकूण 5,18,000/- रु चा मुददेमाल जप्त करण्यात आला. चालक वामन हिरामण चव्हाण रा. देवीतांडा कृष्णनगर ता. पुसद, टिपर मालक अबू ऊर्फ साहेब खान खाजे खान पठाण रा. डोंगरगांव ता. महागांव यांच्या विरुध्द कलम 303 (2), 3(5) भान्यासं प्रमाणे पोफाळी पोलीस स्टेशन प्रमाणे गुन्हा नोंद केला.

कारवाई करणारे पथक

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, पोउपनि शरद लोहकरे, पोहवा  संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा रमेश जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोशि सुनिल पंडागळे यांनी केली.

Post a Comment

0 Comments